राठोडांच्या कुटुंबाची आम्ही माफी मागायची मग तुम्ही करुणा मुंडेंची माफी मागणार का?

Supriya Sule|Chitra Wagh : भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.
Chitra Wagh & Supriya Sule Latest News
Chitra Wagh & Supriya Sule Latest News Sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : गेले अनेक दिवसांपासून शिंदे सरकाराचा बहुचर्चीत असलेला मंत्रीमंडळ विस्तार मंगळवारी (ता.९ ऑगस्ट) पार पडला. त्यामध्ये भाजपच्या ९ आणि शिंदे गटाच्या ९ अशा एकूण १८ मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. मात्र, या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटातील आमदार संजय राठोड (Sanjay Rathod) यांनाही स्थान देण्यात आले आहे. यावरून विरोधकांनी भाजप आणि शिंदे गटाविरोधात जोरदार टीका करण्यात येत आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनीही भाजपवर टीका केली आहे. भाजपने राठोड यांना क्लिन चिट देऊन आणले आहे. त्यामुळे माझी राठोडांच्या वतीने भाजपला विनंती आहे की, त्यांनी राठोड, त्यांची पत्नी, त्यांच्या मुलांची आणि बंजारा समाजाची माफी मागायला हवी, अशी खोचक टीका त्यांनी भाजपवर केली होती. यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राठोडांच्या कुटुंबाची आम्ही माफी मागायची मग तुम्ही करुणा मुंडेंची माफी मागणार आहात का? असा सवाल उपस्थित करत सुप्रिया सुळेंना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. वाघ यांनी एका खासगी वृत्तवाहिनींशी संवाद साधला.

Chitra Wagh & Supriya Sule Latest News
महिलांचे अस्तित्वच सरकारला अमान्य; शिंदे-फडणवीस सरकारवर मनसेची टीका

चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टीकेवर म्हणाल्या की, जर मंत्री राठोडांच्या कुटुंबाची आम्ही माफी मागायची, तर मग करुणा मुंडेंचं काय करायचं? तुम्ही करुणा मुंडेंची माफी मागणार आहात का? त्यामुळे उगाचच शहाणपना करण्याच्या गोष्टी करू नेयेत, अशा शब्दात वाघ यांनी सुप्रिया सुळे यांना सुनावले आहे. सुप्रियाताई या राज्यातील खूप मोठ्ठ्या नेत्या असून त्या महाविकास आघाडीच्या नेत्या आहेत. मात्र मला त्यांना सांगायचे आहे की, जर राठोडांच्या कुटुंबाची आम्ही माफी मागायची मग करुणा मुंडेंचं काय करायचं? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

वाघ पुढे म्हणाल्या, महाविकास आघाडीने, मग त्यामध्ये राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना आली. ज्या पद्धतने करुणा यांची धिंड काढली, तिच्या गाडीत कशा पद्धतीने पिस्तुल ठेवण्यात आला. तिला कशा पद्धतीने जेलमध्ये टाकण्यात आलं हे संपूर्ण राज्याने बघितले आहे. त्यामुळे तुम्ही करुणा मुंडेंची (शर्मा) माफी मागणार का? असा सवालही वाघ यांनी सुळे यांना विचारला.

Chitra Wagh & Supriya Sule Latest News
शिंदे गटाचे 22 आमदार शपथविधीला अनुपस्थित... `मातोश्री`चे आहे लक्ष!

दरम्यान, राठोड यांच्या विरोधातील लढा चालूच राहणार असून ज्या पद्धतीने आमची आधी भूमिका होती, त्याच पद्धतीने हा लढा पुढेही सुरू राहील. याबरोबरच राठोड यांना महाविकास आघाडीने आणि ठाकरे सरकारनेच सर्वात पहिले क्लिनचीट दिली होती. यामुळ तेव्हाचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गृहमंत्री, पुण्याचे पोलीस आयुक्तांना विचारायला हवे, की त्यांना कशी क्लिनचिट मिळाली? असा सवाल उपस्थित करत याबाबत पीआयएल दाखल केली आहे. न्याय देवतेवर माझा विश्वास आहे, असेही चित्रा वाघ म्हणाल्या आहेत. आता यावर महाविकास आघाडीच्या नेत्याकडून काय प्रतिक्रिया येते हे बघावे लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com