लबाड्या करणाऱ्या दूध संघाच्या संचालकांना जेलमध्ये पाठवा : मोहितेंची केदारांकडे मागणी

चोरीचा धंदा करणारे संचालक करोडपती झाले, परंतु गवळी मात्र भिकारी झाला आहे. आजही तोच धंदा सुरू आहे.
Sunil kedar-Dilip Mohite
Sunil kedar-Dilip MohiteSarkarnama
Published on
Updated on

कडूस (जि. पुणे) : 'दूध संघाचे संचालक करोडपती आणि गवळी मात्र भिकारी, हे चित्र बदलायचे असेल तर चोरीचा धंदा करणाऱ्या संचालकांवर कारवाई करा. त्यांचे सभासदत्व बाद करा आणि अशा संचालकांना जेलमध्ये पाठवा,' अशी जाहीर मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार दिलीप मोहिते (Dilip Mohite) यांनी राज्याचे दुग्धव्यवसाय विकास व पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार (sunil Kedar) यांच्याकडे केली. (Send corrupt milk directors to jail : Dilip Mohite)

खेड तालुक्यातील कडूस येथे राज्य सरकारच्या ६५ लाख ८१ हजार रुपयांच्या निधीमधून बांधलेल्या पशुवैद्यकीय इमारत व अधिकारी निवास इमारतीचे लोकार्पण राज्याचे दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी आमदार मोहिते यांनी ही मागणी केली. आमदार मोहिते म्हणाले की, 'काही महिन्यांपूर्वी मी कात्रज दूध संघावर प्रशासक नेमा, अशी मागणी केली होती. ती याचसाठी की तिथे लांड्यालबाड्या केल्या जातात. माझा पशुपालक शेतकरी मरमर मरतो, कष्ट करतो आणि डेअरीला दूध घालतो. त्यांना चार रुपये मिळत नाही. परंतु संचालक मात्र करोडपती झाले आहेत.

Sunil kedar-Dilip Mohite
महाडिकांना आणखी एका अपक्ष आमदाराचा पठिंबा मिळणार; विजयाबाबतही केला दावा!

लॅक्टोमीटरमध्ये गमतीजमती करून खासगी संस्थेला डेअरीचे दूध कमी दराने मिळवायचे अन चोरीचा धंदा करायचा. चोरीचा धंदा करणारे संचालक करोडपती झाले, परंतु गवळी मात्र भिकारी झाला आहे. आजही तोच धंदा सुरू आहे. दूध संघातील चोऱ्या थांबल्या पाहिजेत. गवळ्यांना न्याय मिळाला पाहिजे. यासाठी जे संचालक खासगी संस्थेला दूध देतात, त्यांचे सभासदत्व बाद करा. लबाड्या करणाऱ्यांना जेलमध्ये पाठवा, असे आमदार मोहिते म्हणाले.

Sunil kedar-Dilip Mohite
राज्यसभा निवडणूक : महाडिकांचे आस्ते कदम.. भाजपच्या गळाला आणखी तीन आमदार!

मंत्री सुनील केदार म्हणाले, 'ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था मजबूत करायची असेल तर शेतीपूरक पशुपालनाच्या व्यवसायावर लक्ष दिले पाहिजे. स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल, तर पंधरा लिटरपेक्षा जास्त दूध देणारे देशी गाईचे वंश व साठ किलो वजनाची शेळी तयार करण्यासाठी काम झाले पाहिजे. यासाठी देशी गोवंश व देशी शेळीचे ब्रीड हायब्रीड करण्यावर भर देणार आहे.'

Sunil kedar-Dilip Mohite
भाजपला बालेकिल्ल्यात धक्का : अजितदादांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

या वेळी जिल्हा दूध संघाचे संचालक अरुण चांभारे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर, महिला जिल्हा उपाध्यक्षा कांचन ढमाले, संध्या जाधव, राजगुरूनगर शहराध्यक्ष सुभाष होले, सरपंच निवृत्ती नेहेरे, पशुसंवर्धन उपायुक्त शीतलकुमार मुकणे, पशुवैद्यकीय अधिकारी-कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com