Sex Workers Voting : मतदान कर्तव्य बजावलं, पण आमच्या अधिकारांचं काय? देहविक्री करणाऱ्या महिलांचा हुंकार...

Lok Sabha Election pune 2024 : एक हजार देहविक्री करणाऱ्या स्त्रियांनी बजावला मतदानाचा हक्क...
Sex Workers Voting
Sex Workers VotingSarkarnama

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी चौथ्या टप्प्यातील आज मतदान पार पडत आहे. राज्यात पुण्यासह 11 लोकसभा मतदारसंघात आज मतदान होत आहे. सकाळपासून नागरिक मोठ्या प्रमाणावर मतदानासाठी बाहेर पडत आहे. लोकशाहीच्या या उत्सवात सर्वच घटकातून मतदान प्रक्रिया पार पडत असताना पुण्यातील बुधवार पेठ येथील देहविक्री करणाऱ्या महिलांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावत, आम्ही तर मतदानाचा हक्क बजावला आहे. पण आमच्या अधिकाराकडे जरा लक्ष द्या, अशी आर्त साद लोकशाहीच्या या उत्सवाला घातली आहे.

पुण्यासह राज्यातील 11 लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडत असून पुणे लोकसभा मतदासंघात दुपारी 3 वाजेपर्यंत पर्यंत 35 टक्के मतदान झालं आहे. पुण्यातील बुधवार पेठेत देशभरातील अनेक भागातून आलेल्या या महिला देहविक्री व्यवसायात गुंतलेले आहेत. यातील जवळपास 1 हजार हून अधिक महिलांचं मतदान पुणे लोकसभा मतदारसंघात नाव आलं आहे. आज या महिलांकडून देखील लोकशाहीच्या या उत्सवात सहभाग घेतलेला पाहायला मिळालं.

(राजकारणातील महत्वाच्या बातम्यांच्या अपडेटस॒साठी सरकारनामाचे अधिकृत WhatsAppचॅनेल फॉलो करा)

Sex Workers Voting
BJP MLA Krishna Khopde : आधी भावनिक केलं नंतर गंडवलं; भाजप आमदार खोपडेंबाबत नेमकं काय घडलं?

यावेळी मतदान करून आलेल्या या महिलांनी सांगितल की, आम्ही आता आमचं मतदानाचा हक्क बजावला आहे. पण आम्हाला पण आमचे अधिकार मिळाले पाहिजे. आज अनेक संकटांना आम्हाला सामोरे जावे लागत आहे. कोणतेही सरकार यावं पण त्यांनी आमच्यासाठी चांगलं काम केलं पाहिजे. शासकीय योजना (Scheme) असतील तसेच अनेक समस्या असतील प्रत्येकाशी तोंड द्यावं लागत आहे. आम्हाला देखील कामगार म्हणून मान्यता मिळायला हवी, असे यावेळी या महिलांनी सांगितल आहे.

Sex Workers Voting
Ajit Pawar NCP : बारामतीत 'घड्याळा'च्या प्रचारासाठी आणलं अन् उन्हातान्हात उपाशी ठेवलं

त्या पुढे म्हणाल्या, आम्ही तर पहिल्यांदा मतदान (Voting) करत आहोत.पण आमच्या अनेक महिला असतील ज्यांना अजूनही कागदपत्र मिळालेलं नाही. आम्हाला आमच्या ज्या समस्या आहे, त्या सोडवल्या गेल्या पाहिजे. आम्ही जे काम करतो ते काम करत असताना आजही तुच्छ नजरेने आमच्याकडे बघितले जातं. आम्हाला कोणत्याही शासकीय योजना देखील मिळत नाही, कल्याणकारी योजना आमच्यासाठी असाव्यात, हीच आमची अपेक्षा असल्याचे या महिलांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com