Pune News: "मोदी सरकारकडून देशातील तपास यंत्रणांचा गैरवापर होत असून, तपास यंत्रणांकडून देशात टोकाची दहशत निर्माण केली जात आहे. आतापर्यंत ११५ विरोधी नेत्यांची ईडीने चौकशी केली आहे. ईडी (ED) हा भाजपचा (bjp) सहकारी पक्ष बनला आहे," अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar News)यांनी सोमवारी पुण्यात केली.
शरद पवारांनी पत्रकार परिषदेत ईडीच्या गैरवापरावरून सरकारवर टीकास्त्र डागले. "निवडणुकीला तुम्ही उभे राहू नका, अशी अप्रत्यक्ष धमकी ईडीमार्फत दिली जात आहे. २००५-२०२३ दरम्यान ईडीने केलेल्या कारवाईत ८५ टक्के लोक हे विरोधी पक्षाचे आहेत. महाराष्ट्रासह अन्य राज्यांतील मंत्र्यांच्या विरोधात तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे," असे पवार म्हणाले. आमदार रोहित पवार यांच्यावर झालेली कारवाई अयोग्य असल्याचे ते म्हणाले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
ईडीचा गैरवापर करून संजय राऊत, अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली होती. त्यामुळे रोहित पवारांना अटक होईल की नाही सांगता येत नाही, असे शरद पवार यांनी सांगितले. ठाकरे गटातील जोगेश्वरीचे आमदार रवींद्र वायकर यांनी रविवारी शिंदे गटात प्रवेश केला. यावर पवार म्हणाले, "तपास यंत्रणांकडून कारवाई सुरू झाल्याने आमदार वायकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. कारवाई सुरू झाली की, पक्ष बदलला असे झाले आहे. एक जण आता महत्त्वाचे मंत्री आहेत, असे सांगत शरद पवारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.
पारनेरचे आमदार नीलेश लंके हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार, अशी चर्चा सुरू आहे. यावर पवारांना विचारले असता ते म्हणाले, " नीलेश लंके यांच्या प्रवेशाबाबत मला माहिती नाही. हे मी तुमच्याकडून ऐकतो आहे,"
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा अद्याप संपलेला नाही. जागावाटपाबाबत पवार म्हणाले," जागावाटपाचा प्रश्न राहिलेला नाही. प्रकाश आंबेडकर यांना किती जागा द्यायच्या याबाबत सध्या चर्चा सुरू आहे. लवकरच त्याबाबत निर्णय होणार आहे. आंबेडकरांचे एक पत्र मला आले आहे. त्यात त्यांनी मते मांडली आहेत. त्यावर चर्चा सुरू आहे. आंबेडकरांच्या हेतूवर शंका घेणे योग्य नाही," "रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांना बरोबर घेऊन जावं अशी आमची इच्छा आहे, असे पवार म्हणाले.
१५ ते १७ तारखेदरम्यान निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो. निवडणूक कधी जाहीर होणार याची वाट पाहत आहोत. निवडणूक यंत्रणेची आम्हाला चिंता वाटते, असा टोला पवारांनी लगावला.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.