Ravindar Waikar: वायकरांनी ठाकरेंची साथ सोडताच कार्यकर्ते आक्रमक; फोटोला फासले काळे

Thackeray Group IN Jogeshwari: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वायकर यांनी ठाकरे गटाला 'जय महाराष्ट्र' केल्याने उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे.
Thackeray Group IN Jogeshwari
Thackeray Group IN JogeshwariSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: मुंबईतील जोगेश्वरी मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेबव ठाकरे पक्षाचे (Thackeray group) आमदार रवींद्र वायकर (Ravindar Waikar Join Shiv Sena) यांनी रविवारी शिंदे यांच्या शिवसेनेत (Shiv Sena) प्रवेश केला. वायकर यांच्या पक्ष प्रवेशाबाबत ठाकरे गटातील कार्यकर्ते नाराज झाले आहेत. जोगेश्वरी (Jogeshwari)येथील संतप्त कार्यकर्त्यांनी वायकर यांच्या बॅनरला काळे फासले, तर काही ठिकाणी त्यांचे बॅनर फाडण्यात आले. याचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत.

रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास वायकर आपल्या कुटुंबीयांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारी निवासस्थान असलेल्या 'वर्षा' बंगल्यावर दाखल झाले. त्यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्तेही होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी पुन्हा एकदा शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेतले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

येत्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वायकर यांनी ठाकरे गटाला 'जय महाराष्ट्र' केल्याने उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. जोगेश्वरी येथील ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. ६५ वर्षीय वायकर हे दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून शिवसेनेत सक्रिय आहेत.

आमदार रवींद्र वायकर यांचा शिवसेना प्रवेशाचा कार्यक्रम सुरू असताना दुसरीकडे जोगेश्वरी पूर्व येथील मेघवाडी विभागात असलेल्या शाखेच्याबाहेर असलेल्या रवींद्र वायकरांच्या फोटोला ठाकरे गटातील कार्यकर्त्यांना काळे फासले. जोगेश्वरी विभागात असलेले वायकरांचे बॅनरही संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांकडून फाडण्यात आले आहे.

Thackeray Group IN Jogeshwari
Dhangar Reservation: ओबीसी एल्गार सभेत फूट? धनगर समाजही लोकसभेच्या रिंगणात; रावसाहेब दानवेंच्या विरोधात...

शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर रवींद्र वायकर म्हणाले, 'बाळासाहेबांनी मला सोपवलेले काम मी केले. आज मी या पक्षात येण्याची काही कारणे आहेत. काही वेळा लोकांसाठी असे निर्णय घ्यावे लागतात. जर लोक देऊ शकत नसतील तर आम्ही त्यांना न्याय कसा देणार? जनतेने काम करण्यासाठी सत्तेत असणे आवश्यक आहे,'

"मी शिवसेनेत गेली 50 वर्षे काम केले आहे. 1974 पहिली जोगेश्वरीची दंगल, त्या वेळेपासून मी बाळासाहेबांसोबत आहे. शिवसेनेचे काम करत आलो आहे. आज शिवसेनेत प्रवेश केला आहे, त्याच्या मागचं कारण वेगळं आहे. विकासकामं, रस्त्यांची कामं, पाण्याचे काम रखडलं आहे. अशा वेळी धोरणात्मक निर्णय लोकांसाठी बदलणं गरजेचं असतं. असं झालं नाही तर लोकांनी न्याय देऊ शकणार नाही," असे वायकर म्हणाले.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com