Maharashtra Kesari : महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेत शरद पवारांना टाळले; अमित शाह असणार प्रमुख पाहुणे!

Sharad Pawar - Amit Shah News : भाजप आणि राष्ट्रवादीचे महाराष्ट्रात कुस्तीगीर संघटनेतही झाले गट?
Sharad Pawar - Amit Shah
Sharad Pawar - Amit ShahSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा येत्या ४ ते ९ नोव्हेंबरला पुणे येथे होत आहे. मात्र, या स्पर्धांसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह प्रमुख पाहुणे असतील. शरद पवार यांना मात्र भाजपच्या गटाने या स्पर्धेसाठी टाळल्याने तो चर्चेचा विषय ठरला.

गेली अनेक वर्षे कुस्तीच्या खेळाचे नेतृत्व शरद पवार यांच्याकडे राहिले आहे. मात्र, यंदा त्यातदेखील भाजपने सवता सुभा निर्माण केला आहे. त्यामुळे यंदा पुण्यात होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह(Amit Shah), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे असणार आहे.

Sharad Pawar - Amit Shah
Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्ग अपघाताला ठरले 'हे' धक्कादायक कारण ?

शरद पवार यांना निमंत्रण देण्यात येणार नसल्याचे कळते. त्यामुळे महाराष्ट्र केसरी, त्यादेखील पुणे शहरात (वाघोली) होतील. मात्र, शरद पवार या वेळी प्रमुख पाहुणे नसतील.(Maharashtra Kesari)

कुस्तीच्या पारंपरिक संघटनेत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी गेली अनेक वर्षे शरद पवार (Sharad Pawar) आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली या संघटनेत अनेक चांगले बदल झाले, नव्या संधी निर्माण झाल्या. मात्र, भारतीय जनता पक्षाने येथेही सवता सुभा निर्माण करीत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ ही स्वतंत्र संघटना निर्माण केली आहे. भाजपचे नेते रामदास तडस हे त्याचे अध्यक्ष आहेत.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस यांच्या संघामध्ये नाशिक जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून ॲड. विशाल बलकवडे यांची निवड करण्यात आली आहे. या संघातर्फे घेण्यात येणारी ६६ वी ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धा पुणे येथे वाघोली लोणीकंदजवळ फुलगाव येथे नेताजी सुभाषचंद्र बोस शाळेच्या मैदानावर या स्पर्धा होणार आहेत. त्याची घोषणा आज करण्यात आली.

नाशिक जिल्ह्याची निवड चाचणी २९ आॅक्टोबर २०२३ रोजी बलकवडे व्यायामशाळा येथे होणार असल्याची माहिती नवनियुक्त जिल्हाध्यक्ष ॲड. बलकवडे यांनी दिली. ही स्पर्धा १० वजन गट- गादी आणि माती अशा गटात होणार आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Sharad Pawar - Amit Shah
Nana Patole News : पटोलेंची पाठ फिरताच, काँग्रेसचे आमदार खोसकर छगन भुजबळांच्या भेटीला!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com