Sharad Pawar’s Stand on NCP Leadership Restructuring – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 26व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित प्रमुख कार्यक्रमात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या भविष्यातील दिशा, नव्या नेतृत्वाची गरज, आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांविषयी स्पष्ट आणि प्रभावी भूमिका मांडली. तसेच जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदावरून दूर होण्याबाबत दिलेले संकेत आणि त्यानंतर नवीन नेतृत्व पक्षाला कधी मिळणार याबाबत शरद पवार यांनी भाष्य केले.
शरद पवार म्हणाले,"पक्ष म्हणजे संघटना आहे आणि या संघटनेच्या कामाला गेल्या 8-10 वर्षांत जयंत पाटील यांनी प्रामाणिकपणे वाहून घेतलं आहे, मात्र जयंत पाटील यांनी स्वतः माझ्याकडे सांगितलं की, नव्या पिढीला संधी दिली पाहिजे. परंतु पक्षाच्या काही कार्यकर्त्यांची मानसिकता वेगळी असल्याचे देखील शरद पवार म्हणाले तसेच यासंदर्भातील कोणताही निर्णय सामूहिक विचारांतीच घेतला जाईल, असंही शरद पवार यांनी स्पष्ट केले.
याशिवाय पुढच्या तीन महिन्यांत होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर लक्ष केंद्रित करून, महिलांच्या प्रतिनिधित्वावर भर द्यायचा आहे. तसेच ,"स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर महाराष्ट्रात नव्या नेतृत्वाचा विचार केला जाईल." असं शरद पवार म्हणाले. प्रत्येक तालुका, जिल्ह्यात नवे चेहरे दिसले पाहिजेत. पक्षात हजारो कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्यातून राज्य चालवण्याचं नेतृत्व घडू शकतं. असे देखील शरद पवार यांनी स्पष्ट केलं.
यावेळी शरद पवार यांनी देशाच्या सध्याच्या परराष्ट्र धोरणांवर चिंता व्यक्त केली. "कधी काळी भारताचं नेतृत्व संपूर्ण उपखंडाला एकत्र ठेवायचं काम करायचं. जवाहरलाल नेहरू यांच्या काळात भारत संवादाचं केंद्र होता. आज मात्र पाकिस्तान, चीन, बांगलादेश यांसारख्या शेजारी देशांशी संबंध चांगले राहिलेले नाहीत," अशी टीका करत त्यांनी सध्याच्या केंद्र सरकारवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.
तर "देशाचं नेतृत्व सुसंवादाची परिस्थिती निर्माण करत नाही, त्याचा फटका देशाला बसतोय," राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, डावे पक्ष व इतर घटकांनी एकत्र येऊन दिल्लीमध्ये संवादाचे वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे.'' असं शरद पवारांनी सांगितलं.
याशिवाय, शरद पवार पुढे म्हणाले, , "कोणी आले आणि गेले तरी फरक पडत नाही, आपण एकसंघ राहिलो तर सत्ता येते, हा आमचा अनुभव आहे,"आगामी निवडणुकीमध्ये चित्र नक्कीच बदलेल असा देखील विश्वास शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केला.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.