Baramati Latest News : लोकसभेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आहे. "आम्ही पुन्हा सत्तेत येऊ," असा विश्वास भाजपने व्यक्त केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी "पुणे आणि बारामती खासदारकीची जागा महायुती जिंकेलच," असा विश्वास व्यक्त केला आहे. पुणे आणि बारामतीच्या जागेवरून बावनकुळेंनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बावनकुळेंना प्रत्युत्तर दिले आहे. बारामतीत ते आज (रविवार) पत्रकारांशी बोलत होते.
शरद पवार म्हणाले, "चंद्रशेखर बावनकुळे हे पक्षाच्या उमेदवारीचे तिकीट देण्यायोग्य नाही. त्यांनी बारामतीची चर्चा करू नये. ज्यांचे तिकीट भाजपने नाकारलं होते, त्यांच्याबाबत काही बोलू नये," "माध्यमांमध्ये बातम्या येण्यासाठी ते नेहमी बारामतीचा उल्लेख करतात," असा टोला पवारांनी बावनकुळेंना लगावला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
कंत्राटी भरतीच्या मुद्द्यावरुन बावनकुळे यांनी विरोधकांना नाक घासून माफी मागा, असा हल्लाबोल केला होता. बारामती जिंकणारच,असे ते कायम म्हणत असतात. त्यावर एका वाक्यातच शरद पवारांनी त्यांचा समाचार घेत विषय संपवला.
मनोज जरांगे पाटील आज (रविवारी) मराठा आंदोलनाची पुढची दिशा ठरविण्यासाठी पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार आहे. यावर पवार म्हणाले, "राज्य सरकार आणि जरांगेमध्ये बोलणं झाल्याची शक्यता आहे. आरक्षणाबाबत संवादातून मार्ग निघाला तर आम्हाला आनंद आहे. आरक्षणाबाबत सरकारची भूमिका लवकरच समजेल. जरांगेच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे. त्यांच्या मागण्या चुकीच्या नाहीत,"
"कंत्राटी पद्धतीने जागा भरणे अयोग्य आहे. कंत्राटीभरतीला भाजपचीही संमती होती. सध्या लोकांचं मत भाजपच्या विरोधात आहेत. पाच राज्यात होणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये जनतेचा कौल भाजपच्या विरोधात आहे," असे एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
काल (शनिवारी) वंचित विकास आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांची मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये घेतली. या भेटीबाबत पवार म्हणाले, "आंबेडकरांसोबतची बैठक अराजकीय होती. बैठकीत इंडिया आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकरांना सामील करून घेण्याबाबत कुठलीही चर्चा झाली नाही," असे पवार म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.