Maratha Reservation : मागण्या मान्य झाल्याशिवाय शुभमचा मृतदेह घेणार नाही! मराठा समाज आक्रमक

Manoj Jarange Patil : मुंबईवरून परत गावाकडे येत असताना विष पिऊन अर्धापूर गावाजवळ त्याने आत्महत्या केली.
Maratha Reservation
Maratha ReservationSarkarnama
Published on
Updated on

Nanded Latest News : "एक मराठा-लाख मराठा', मराठा आरक्षण मिळण्यासाठी मी माझ्या जीवाचे बलिदान देत आहे, माझे बलिदान वाया जाऊ नये," अशी चिठ्ठी लिहित शुभम पवार (वय २४) याने आत्महत्या केली आहे. त्यांच्या आत्महत्येनंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे.

शुभम पवार याच्या कुटुंबाला मुख्यमंत्री सहायता निधीतून 50 लाखाची मदत , त्याच्या बहिणीला सरकारी नोकरी , कुटुंबाला घरकुल या मागण्या मान्य होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका सकल मराठा समाजाकडून घेण्यात आली आहे.

Maratha Reservation
Maharashtra Politics : आमदारांच्या संख्येत वाढ होण्याने सगळीचे गणिते बदलणार, फडणवीसांचे सूचक संकेत

तीन दिवसापूर्वी सुनील कावळे या तरुणाने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना याच मागणीसाठी शुभमने आत्महत्या केली आहे. नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात ही घटना घडली आहे. मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करीत असल्याचे शुभम पवार याने लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटलं आहे. मुंबईवरून परत गावाकडे येत असताना विष पिऊन अर्धापूर गावाजवळ त्याने आत्महत्या केली.

काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्यांचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या मुद्द्यावर सरकारने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. शुभमनं आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली आहे. याच पार्श्वभूमीवर आज हदगांव-तामसा येथे बंद पाळला जाणार असल्याची घोषणा मराठा संघटनांकडून करण्यात आली आहे.

तीन दिवसापूर्वी जालन्यातील अंबडचे रहिवासी असलेल्या सुनील बाबुराव कावळे या तरुणाने मुंबईत आत्महत्या केली. त्याने टी-शर्ट आणि वहीच्या पानावर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या करत असल्याचं लिहिलं आहे. त्यापूर्वी त्याने मनोज जरांगे पाटलांना पत्र लिहिलं होतं. त्यानंतर त्याने अचानक टोकाचं पाऊल उचललं आहे.

Maratha Reservation
Ajit Pawar News : पालकमंत्रीपदाची सुत्रे घेताच अजितदादा पुन्हा सक्रीय; अन्य पक्षांमध्ये वाढली अस्वस्थता...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com