Sharad Pawar Shirur Tour : शरद पवारांनी घातलं शिरूरमध्ये लक्ष; आजी-माजी आमदारांच्या भेटीगाठी!

Sharad Pawar In Action Mode : पक्षफुटीनंतर अजित पवार समर्थक आमदार पहिल्यांदाच शरद पवारांसोबत कार्यक्रमात येणार...
Sharad Pawar
Sharad Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Pimpri Chinchwad News : राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर शरद पवार हे उद्या (ता.१) प्रथमच आपला खासदार (डॉ. अमोल कोल्हे) असलेल्या शिरूरच्या दौऱ्यावर जात आहेत. यामध्ये तीन अराजकीय कार्यक्रम असले, तरी त्यादरम्यान त्यांच्या राजकीय भेटी आणि चर्चाही होणार आहे. त्यातही उपमुख्यमंत्री अजित पवारांना समर्थन दिलेले खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील आणि शरद पवार हे आळंदीत मंदिर सभामंडप पायाभरणीला एकत्र येत असल्याने त्याकडे संपूर्ण खेड तालुक्याचे लक्ष लागले आहे. (Latest Marathi News)

Sharad Pawar
Kolhapur NCP : 'दिल्या घरी सुखी राहा'; राष्ट्रवादीच्या माजी जिल्हाध्यक्षांचा अजित पवार गटाच्या शहराध्यक्षांना चिमटा

पवारांच्या उद्याच्या दौऱ्याची सुरुवात सकाळी साडेनऊ वाजता आळंदीतील संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचे दर्शन घेऊन होणार आहे. नंतर पावणेदहा वाजता ते तेथील ग्रामदैवत हजेरी मारुती मंदिराच्या सभामंडपाच्या दगडी कामाची पायाभरणी करतील. त्यावेळी स्थानिक आमदार मोहिते हेही उपस्थित असणार आहेत. पक्षफुटीनंतर आमदार मोहिते पाटील हे अजित पवार गटात गेले आहेत. मात्र, उद्या शरद पवार यांच्या कार्यक्रमात उपस्थिती लावणार आहेत.

आमदार मोहिते आणि पवार हे प्रथमच एकत्र येत असल्याने ते एकमेकांशी संवाद साधणार का, भाषणादरम्यान ते काय बोलणार याकडे खेड तालुक्याचेच नाही, तर उत्तर पुणे जिल्ह्याचेही लक्ष लागले आहे. माझ्या मतदारसंघातील हा अराजकीय कार्यक्रम असल्याने त्याला हजर राहणार असल्याचे आमदार मोहितेंनी `सरकारनामा`ला सांगितले. आळंदी गावठाणातील मारुती मंदिराच्या गाभाऱ्याचे बांधकाम झाले असून, सभामंडपाचे काम बाकी आहे.

Sharad Pawar
NCP-BJP Politics : 'बारामती अॅग्रो'वर कारवाई : राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांचा भाजपाला खुला इशारा; याचं उत्तर लवकरच देऊ...

चर्‍होलीतील वारकरी संमेलनालाही पवार राहणार उपस्थित -

आळंदीनंतर दहा वाजता पवार हे पिंपरी-चिंचवडमधील चऱ्होली येथील भागवत वारकरी महासंघाच्या वारकरी संमेलनाला उपस्थित राहणार आहेत. तेथे अजित पवारांना साथ दिलेले भोसरीचे माजी आमदार विलास लांडे हेही व्यासपीठावर आहेत. वारकऱ्यांचे संमेलन असल्याने एक वारकरी म्हणून चऱ्होलीला जाणार असल्याचे लांडेंनी सांगितले.

या कार्यक्रमानंतर पवार हे आळंदीतून हेलिकॉप्टरने जुन्नरला जाणार आहेत. तेथे दुपारी आदिवासी चौथरा तथा काळा चबुतरा अभिवादन दिनानिमित्त बिरसा ब्रिगेडने आयोजित केलेल्या राष्ट्रीय आदिवासी अधिकार परिषदेचे अध्यक्षस्थान ते भूषविणार आहेत. तेथे तटस्थ राहिलेले स्थानिक आमदार राष्ट्रवादीचे अतुल बेनके हे उपस्थित असणार आहेत. तत्पूर्वी ते ओझर येथील विघ्नहर सहकारी साखर कारखान्यावर तासभर भेटीगाठी घेऊन चर्चा करणार आहेत.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com