Pimpri Chinchwad NCP Politics : राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांत जुंपली, शरद पवार गटाने केली शहर पक्ष कार्यालय सोडण्याची मागणी

Sharad Pawar Vs Ajit Pawar Group : अजितदादांनी नैतिकता दाखविली,तशी पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीनेही दाखवावी.
Ajit Gahvane & Sunil Gavhane
Ajit Gahvane & Sunil Gavhane Sarkarnama
Published on
Updated on

उत्तम कुटे

Pimpri Chinchwad : राष्ट्रवादीतील उभ्या फुटीनंतर अजित पवार गट राज्यातील भाजप-शिवसेना सरकारमध्ये सामील झाला. त्यांना साथ देणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर आता राष्ट्रवादी(शरद पवार) कडून थेट बडतर्फीच्या कारवाईचा सपाटा सुरु झाला आहे. त्यावरून पिंपरी-चिंचवड या अजित पवार आणि शरद पवार या दोघांच्याही आवडत्या शहरात त्यांच्या गटात आता जुंपली आहे.

शरद पवार(Sharad Pawar)गटाच्या प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांनी राष्ट्रवादीच्या पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा महिलाध्यक्षा कविता आल्हाट यांची हकालपट्टी केली होती. त्यानंतर मंगळवारी (ता.१८) शहराध्यक्ष अजित गव्हाणे,कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, जगदीश शेट्टी, राहूल भोसले आणि फजल शेख यांना पक्षाने बडतर्फ केले. त्यावरून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांत आता जुंपली आहे.

Ajit Gahvane & Sunil Gavhane
Sharad Pawar In Opposition Meeting : राहुल गांधी, ममता बॅनर्जी आणि ठाकरेही बोलले; पण पवारसाहेब बोललेच नाहीत...

शरद पवार राष्ट्रवादी(NCP)च्या नव्या शहर कार्यकारी समितीतील सुनील गव्हाणे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील अजित गव्हाणेंना त्यांच्या बडतर्फीनंतर आणखी डिवचले. अजित पवार यांनी बंड केल्यानंतर जसे मुंबईत स्वत:च्या पक्षासाठी स्वतंत्र कार्यालय सुरु केले. तसेच पिंपरी-चिंचवडमध्येही त्यांच्या पक्षाने सध्य़ाचे शहर कार्यालय सोडून नवे थाटावे असे आव्हान त्यांनी `सरकारनामा`शी बोलताना दिले. दादांनी नैतिकता दाखविली,तशी ती पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीनेही (अजित पवार) दाखवावी असे ते म्हणाले.

दरम्यान, सुनील गव्हाणेंची आव्हानवजा अजित गव्हाणे(Ajit Gavhane) यांनी लगेच फेटाळून लावली. पिंपरी-चिंचवड शहर कार्यालय अजितदादांनी घेतलेले असल्याने ते सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे त्यांनी `सरकारनामा`ला सांगितले. शहरातील प्रत्येक कामात दादांचे योगदान आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले. बडतर्फीची कारवाई अपेक्षितच होती असे ते म्हणाले.

Ajit Gahvane & Sunil Gavhane
PM Modi on Opposition Meet : 'एनडीए'ची युती मजबुरी नव्हे तर मजबुती; पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर निशाणा !

याचबरोबर शरद पवार गटातून बडतर्फ केलेले शहर कार्याध्यक्ष फजल शेख यांनीही सुनील गव्हाणेंच्या आव्हानावर प्रतिक्रिया दिली आहे. ही कारवाई उलट उशिरा झाली, ती अगोदरच अपेक्षित होती असेही ते म्हणाले. तिचे त्यांनी स्वागत केले. त्याबद्दल धन्यवाद दिले. तसेच शेवटपर्यंत दादांसोबत राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com