PM Modi on Opposition Meet : 'एनडीए'ची युती मजबुरी नव्हे तर मजबुती; पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर निशाणा !

PM Narendra Modi: 'देशातील सर्व जनतेला एनडीएवर विश्वास...'
PM Narendra Modi:
PM Narendra Modi: Sarkarnama
Published on
Updated on

NDA Meeting : विरोधी पक्षांची आज बंगळुरुमध्ये महत्वाची बैठक पार पडली. तर दुसरीकडे भाजप प्रणित एनडीएची दिल्लीत बैठक झाली. या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित करत एनडीएच्या सरकारने केलेले कामं सांगत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.

आमच्यासाठी एनडीएची युती ही मजबूरी नाही तर मजबूती आहे. एनडीए ज्यावेळी विरोधात होतं त्यावेळीही 'एनडीए'ने सकारात्मक राजकारण केलं, असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेससह विरोधकांवर जोरदार टीका केली.

नरेंद्र मोदी म्हणाले, "आजही एनडीएबरोबर अनेकजण जोडले जात आहेत. विकसित भारत करण्याचं एनडीएचं आमचं लक्ष्य आहे. कारण आमच्या भावना साफसाफ आहेत. आमचा रस्ताही सरळ असून आमचा संकल्प सकारात्मक आहे. त्यामुळे देशातील सर्व जनतेला एनडीवर विश्वास आहे. उद्धव ठाकरे यांचे सहयोगी देखील आज आमच्याबरोबर (एनडीए) आहेत", असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं कौतुक केलं.

PM Narendra Modi:
Konkan News : कोकणातील ठाकरे गट सोमय्यांच्या विरोधात आक्रमक;प्रतिमेला काळे फासले, भाजपतून हकालपट्टीची मागणी

"कोणतंही सरकार बहुमताने चालतं. तर देश विकासाच्या प्रयत्नांनी चालतो. एनडीएची स्थापना ही कोणाला सत्तेतून हाटवण्यासाठी नाही तर देशात स्थिरता आणण्यासाठी झाली. आम्ही कधीही नकारात्मक राजकारण केलं नाही तर सकारात्मक राजकारण केलं. मात्र, काँग्रेसने सरकार बनवली आणि बिघडवली. काँग्रेसने ९० च्या दशकात देशात अस्थिरता आणण्यासाठी युतीचा प्रयोग केला. त्याच काळात एडीएची निर्मिती झाली".

PM Narendra Modi:
NDA Meeting In Delhi : 'एनडीए'च्या बैठकीत शिंदे-पवारांना मानाचे पान ; मोदी-शाहांसोबत पहिल्या रांगेत

"केवळ सत्ता मिळवणे एनडीएचा उद्देश नाही. एनडीए कोणाच्या विरोधात किंवा कोणाला सत्तेपासून दूर करण्यासाठी नाही. केवळ स्थिरता आणण्यासाठी एनडीएची निर्मिती झाली होती. देशात स्थिर सरकार असेल तर देशात असे निर्णय घेता येतात. त्यामधून देशाची दिशा बदलता येते. आम्ही कधीही लोकभावनेचा अनादर केला नाही. देश सर्वांच्या प्रयत्नाने चालतो", असं यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com