
Pune News, 25 Jan : राज्यात सातत्याने वाढत चाललेल्या महिला अत्याचारच्या घटनांवरून विरोधक आक्रमक झाले आहेत. विरोधकांकडून राज्य महिला आयोग बरखास्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर बोलताना महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षावर गंभीर आरोप केले आहेत.
तुतारीचे पदाधिकारी हे महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये आघाडीवर असून खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी त्यांची कार्यशाळा घ्यावी, असा खोचक सल्ला चाकणकर यांनी दिला आहे. राज्यातील वाढत्या महिला अत्याचाराच्या घटनांनंतर राज्य महिला आयोग बरखास्त करा अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. यावर बोलताना रूपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
त्या म्हणाल्या, "मागील तीन वर्षांमध्ये राज्य महिला आयोग सक्षमपणे काम करत असल्याने राज्यात कुठेही महिला अत्याचाराबाबत घटना घडल्यानंतर राज्य महिला आयोगाची आठवण येते. कारण राज्य महिला आयोग आपल्याला न्याय मिळवून देईल असा विश्वास लोकांमध्ये आहे. हे माझ्या कामाचं यश आहे."
तर, महाराष्ट्रामध्ये कुठेही महिला अत्याचाराची घटना घडल्यानंतर आम्ही त्याची दखल घेतो. मात्र काही प्रकरणांमध्ये पोलिस (Police) कारवाई करत असतील, तपास करत असतील तर महिला आयोग त्यामध्ये इंटरफेअर करत नाही. मात्र, एखाद्या प्रकरणांमध्ये महिलेला न्याय मिळण्यास दिरंगाई होत असेल अथवा तिला न्याय मिळत नसल्यास महिला आयोग त्याची दखल घेतो. विरोधक टीका करत आहेत.
कारण महाराष्ट्रातील जनतेने त्यांना विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून घरी बसण्याचा संदेश दिल्यामुळे त्यांच्याकडे टीका करण्याशिवाय दुसरं कोणतंही काम नाही, असं म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. महाराष्ट्रातील कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना घडल्यानंतर विद्या चव्हाण या त्याबाबत बोलतात हे हास्यास्पद आहे. कारण त्यांनी त्यांच्या सुनेचा किती छळ केलाय हे सगळ्यांना माहिती आहे.
शरद पवारांच्या (Sharad Pawar) पक्षांमध्ये महिला प्रदेशाध्यक्ष पद भूषवलेली महिला जर सुनेचा छळ करत असेल तर त्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट दुसरी कोणतीही नाही, असं म्हणत त्यांनी चव्हाण यांच्यावर टीका केली. तसेच कुरारमध्ये घडलेल्या घटनेमधील पीडित महिला आणि त्यांच्या दोन मुलींचा विनयभंग करणारा वार्ड अध्यक्ष हा तुतारी गटाचा आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक महिला अत्याचाराच्या ज्या घटना होत आहेत. त्यामध्ये तुतारीचे पदाधिकारी आघाडीवर आहेत.
त्यामुळे खासदार सुप्रिया सुळे यांनी या पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा घेऊन समाजात कसं वागायचं याचे धडे दिले तर निम्मा महाराष्ट्र सुरक्षित होईल, अशी बोचरी टीकाही चाकणकर यांनी केली. तर पूर्वी अशा घटना घडल्या आहेत ज्यामध्ये नगरचे मुरकुटे यांच्यावर झालेली लैंगिक अत्याचाराबाबत कारवाई झाली आहे. तसेच त्यांच्या मीडिया सेलचे प्रदेश सरचिटणीस हे महिलांचे अश्लील व्हिडिओ बनवतात त्याच्यावर आतापर्यंत सोशल मीडियाचे चार गुन्हे दाखल आहेत. एकूणच तुतारी गटाचे पदाधिकारी हे महिलांवर अत्याचार करण्यात आघाडीवर आहेत, असा गंभीर आरोप यावेळी चाकणकरांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.