Prashant Jagtap Resigns: पुण्याच्या राजकारणातील मोठी बातमी; दोन्ही राष्ट्रवादीची गट्टी जमली अन् शरद पवारांच्या शिलेदाराने साथ सोडली

Sharad Pawar Shocked as NCP Pune City Chief Prashant Jagtap Resigns : कोणत्याही परिस्थितीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडी करणार नाही. महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही आगामी निवडणुका लढू असे प्रशांत जगताप यांनी स्पष्ट केलं होतं.
Prashant Jagtap Resigns
Prashant Jagtap ResignsSarkarnama
Published on
Updated on

PMC Election 2025 News : आगामी पुणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादीची गट्टी जमली असतानाच धक्कादायक माहिती समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष असलेल्या प्रशांत जगताप यांनी पक्षाला सोडचिट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे.

नगरपालिका निवडणुकीमध्ये काही ठिकाणी अजित पवार आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यानंतर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षाच्या एकत्रीकरणाबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. या चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुण्याचे शहराध्यक्ष असलेल्या प्रशांत जगताप यांनी मात्र दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यास आपण राजकारणातून काही काळासाठी थांबू असा निर्वाणीचा इशारा दिला होता.

कोणत्याही परिस्थितीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडी करणार नाही. महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही आगामी निवडणुका लढू असे प्रशांत जगताप यांनी स्पष्ट केलं होतं. एकीकडे प्रशांत जगताप दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीला विरोध करत असताना दुसरीकडे मात्र वरिष्ठ पातळीवर नेते मात्र आघाडीच्या चर्चांना अंतिम स्वरूप देताना पाहायला मिळाले.

खासदार सुप्रिया सुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस मधील वरिष्ठ नेते या आघाडीला सकारात्मक असल्याचे देखील समोर आलं होतं. त्यानंतर या चर्चांना अंतिम स्वरूप देण्यात आल्या असून पुढील एक ते दोन दिवसात दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रित येण्यावर शिक्कामोर्तब होणार आहे.

Prashant Jagtap Resigns
Saurabh Tayde : शरद पवारांच्या पठ्ठ्यानं विदर्भात इतिहास घडवला! 21 वर्षीय तरुण बनला नगराध्यक्ष

यासाठी शरद पवार गटाकडून एक समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यात माजी खासदार वंदना चव्हाण, पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे यांचा समावेश आहे. मात्र, या समितीतून शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना दूर ठेवण्यात आले आहे.

या घडामोडींनंतर जगताप यांनी आपल्या समर्थक कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली. बैठकीत त्यांनी पक्षाच्या पदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. उच्चपदस्थ सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांनी हा राजीनामा खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे सुपूर्द केला आहे.

Prashant Jagtap Resigns
Navapur Nagar Parishad Result: नवापुरात अजितदादांची जादू; नंदुरबारमध्ये शिदेंनी मैदान मारलं; महायुतीचं पारडे जड

राजीनामा स्वीकारल्यानंतर आता प्रशांत जगताप हे ठाकरे सेनेचा अथवा काँग्रेसचा पर्याय निवडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पक्षांचा पर्याय घेऊन ते आगामी महापालिकेच्या निवडणुकीत उतरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रशांत जगताप यांच्याशी याबाबत संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com