Sharad Pawar News : शरद पवारांच्या 'मॅरेथॉन' भेटीगाठी; 'तुतारी' फुंकण्यासाठी इच्छुक नेत्यांची रीघ

NCP SharadChandra Pawar Politics : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे मॅरेथॉन भेटीगाठी घेत आहेत. मंगळवारी (ता.15) सकाळपासूनच पवारांच्या भेटीगाठीसाठी मोठ्या प्रमाणात नेतेमंडळींनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं.
Sharad Pawar News
Sharad Pawar NewsSarkarnama
Published on
Updated on

Pune News : लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने दमदार कामगिरी केली यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा सर्वाधिक चांगला स्ट्राईक रेट राहिला. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षांमध्ये पक्षप्रवेश करण्यासाठी मोठ्या प्रमाणात रांगा लागल्याच्या पाहायला मिळत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे मॅरेथॉन भेटीगाठी घेत आहेत. मंगळवारी (ता.15) सकाळपासूनच पवारांच्या भेटीगाठीसाठी मोठ्या प्रमाणात नेते मंडळींनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे भाजप तसेच महावीकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांनी देखील शरद पवारांची भेट घेऊन पक्ष प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली.

नेते भेटीला आणि...

गेल्या काही दिवसांपासून अनेकवेळा पिंपरी चिंचवडचे माजी आमदार आणि अजित पवार गटाचे नेते विलास लांडे यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. आज देखील ते शरद पवारांच्या भेटीला आले होते. मात्र, या भेटीनंतर त्यांनी आपण निवडणूक तिकीट मागायला आलो नसून पक्षातील इतर नेत्यांना बळ देण्याच्या दृष्टीकोनातून आज चर्चा करण्यासाठी आलो असल्याचं त्यांनी सांगितलं.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते असलेले उमेश पाटील यांनी देखील आपण हुकूमशाहीला कंटाळलो असून याबाबत चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं सांगत राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) शरद पवार पक्षामध्ये प्रवेश करण्यास ते इच्छुक असल्याचं स्पष्ट केलं.

Sharad Pawar News
Eknath Shinde News : निवडणुकीची घोषणा होताच CM शिंदेंचा मोठा दावा; म्हणाले,'आमचं सरकार पूर्ण बहुमतानं...'

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी देखील शरद पवारांची भेट घेत महाविकास आघाडीमध्ये सामावून घेण्याबाबत चर्चा केली. कार्यकर्त्यांची महाविकास आघाडीसोबत जाण्याची इच्छा असून सन्मानाने घेतल्यास आपण महाविकास आघाडीमध्ये जाणार असून आगामी निवडणुकीत 23 विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवण्याची तयारी केल्याचं देखील त्यांनी सांगितलं.

विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसची मतं फुटल्याने पराभव स्वीकारावा लागलेले शेकापचे नेते जयंत पाटील यांनी नाराजी दूर सारत आज शरद पवारांची भेट घेतली. आणि महाविकास आघाडी सोबत आगामी निवडणुका लढण्याची इच्छा प्रदर्शित केली. तसेच 22 ते 23 जागा सोडण्याची मागणी देखील यावेळी त्यांनी लावून धरली.

Sharad Pawar News
Imtiaz Jaleel Met Manoj Jarange Patil : निवडणुकीचा बिगुल वाजताच इम्तियाज जलील अंतरवालीत धडकले

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ची मराठवाड्यातील रणनीती बाबत खासदार बजरंग सोनावणे यांनी शरद पवारांची चर्चा केली. बीड लोकसभा मतदारसंघातील सहाच्या सहा जागा महाविकास आघाडी जिंकेल असा विश्वास देखील व्यक्त केला. तर पक्षांमध्ये येऊ इच्छिणाऱ्यांबाबत शरद पवार योग्य ते निर्णय घेतील असं देखील सांगितलं.

धवल सिंह मोहिते पाटील आणि काँग्रेसचे माजी आमदार धनाजी साठे, माढ्याच्या नगराध्यक्ष मीनल साठे यांनी देखील शरद पवारांची भेट घेत विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा केली. नंतर नेमकं कोणाचा पक्षप्रवेश होणार आणि कोण वेटिंग वरती राहणार याबाबतच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगल्या आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com