Pune News : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडून आता शिरूर वरती लक्ष केंद्रित करण्यात आले असून शिरूरच्या मैदानात एकीकडे अजित पवार तर दुसरीकडे शरद पवार (NCP) धडाकेबाज सभा घेताना दिसत आहेत. एकीकडे अजित पवार मोदींना विकास पुरुष सांगत देशाच्या विकासासाठी पुन्हा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी महायुतीला मतदान करण्याचे आवाहन करत आहेत.
तर शरद पवार मोदी यांना संविधान विरोधी सांगत मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास लोकशाही धोक्यात येईल असं सांगत आहेत. चाकणमध्ये झालेल्या सभेत अशाच प्रकारे शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. महाविकास आघाडीचे उमेदवार खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या चाकण येथील सभेत शरद पवार बोलत होते. Current News about Maharashtra Politics
पवार म्हणाले, हा देश लोकशाही असलेला देश आहे. जगातील श्रेष्ठ लोकशाही भारतात आहे. लोकशाहीची आस्था आणि औसुक्य जगाला आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकारी लोकशाहीवर संकट आणू पाहत आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
शरद पवार म्हणाले, येणाऱ्या सरकारकडे जगाचे लक्ष आहे. हा देश लोकशाही असलेला देश आहे. लोकशाहीवर मोदी आणि त्यांचे सहकारी संकट आणू पाहत आहेत. त्यांना घटना आणि संविधान बदलायचे आहे. ज्यावेळी टीका व्हायला लागली त्यावेळी मोदी सांगू लागले आम्ही घटनेला हात लावणार नाही. घटना बदलण्यासाठी मोदींचे हात बळकट करण्याचे आवाहन भाजप नेते करीत आहेत. त्यासाठी 400 खासदार निवडून द्या. याचा अर्थ हा असा आहे की, आमच्या अधिकारावर गदा आणण्याचा डाव त्यांनी तयार केला आहे. त्यापासून आपण सावध भूमिका घेतली नाही तर हिंदुस्थानची लोकशाही धोक्यात जाण्याची भीती पवार यांनी व्यक्त केली.
जवाहर नेहरू, इंदिरा गांधीसह जे जे पंतप्रधान झाले; त्यांच्या सभा आम्ही ऐकल्या आहेत; मात्र त्यापेक्षा लाजिरवाणी भाषा पंतप्रधान मोदी (Narendra Modi) करीत आहेत. मोदी राज्यात येतात आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), शरद पवार यांच्यावर टीका करतात. मात्र, आमच्या अंगाला टीकेमुळे भोके पडणार नाहीत. ते या ठिकाणी नाही त्या गोष्टी सांगतात. नव्या पिढीचा नेता राहुल गांधी (Rahul Gandhi) पायी सर्व देशात फिरला; लोकांशी संवाद साधला, त्यांची दुःख समजून घेतली; त्यांची मोदी टिंगल करत आहेत. पंडित नेहरू, राजीव गांधी, इंदिरा गांधी यांनी देशासाठी त्याग केला मात्र त्याची नोंद घेणे सोडा तर त्यांच्या बाबत वेडेवाकडे बोलले जात आहे. शेतमालाला रास्त किंमत मिळालीच पाहिजे, प्रत्येकाला काम मिळाले पाहिजे स्रियांचा सन्मान झाला पाहिजे. त्यासाठी संसदेत अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्या सारखे नेतृत्व जायला हवे. असंही पवार यांनी म्हटलं आहे.
बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) म्हणाले, देशाचे राज्याचे राजकारण भाजपने पूर्णपणे बिघडवले आहे. भाजपने (BJP) महाराष्ट्राचे जास्त नुकसान केले आहे. मतदारावर आणि मतदानावर आघात होतो की काय अशी देशात परिस्थिती निर्माण झाली आहे. देशाचे काय होणार अशी स्थिती आहे बिघडवलेले राजकारण आपल्याला सुधारायचे आहे. अशा वेळी योग्य प्रतिनिधी आपल्याला संसदेत पाठवायचे आहे. डॉ अमोल कोल्हे यांना लोकसभेत पुन्हा पाठविण्याची जबाबदारी आपली आहे. राज्य आणि देश पुढे न्यायचा आहे आपली जबाबदारी आहे आहे. आपले मत आदर्श लोकप्रतिनिधी डॉ. अमोल कोल्हे यांना देत आहोत. ते थेट शरद पवार, उद्धव ठाकरे, राहुल गांधी, सोनिया गांधी यांना जाणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.