Sharad Pawar : "पतंगरावांनी भारती विद्यापीठ वाढवली, पण त्यांची खरी निष्ठा मात्र..." पवारांनी जागवल्या आठवणी!

Sharad Pawar : आम्हा लोकांचा खंदा पुरस्कर्ता, पाठीराखा पतंगराव कदम होते.
Sharad Pawar
Sharad Pawar Sarkarnama
Published on
Updated on

पुणे : काँग्रेसचे दिवंगत नेते व भारतीय विद्यापीठाचे संस्थापक पतंगराव कदम यांच्या जन्मदिवसानिमित्त त्यांच्या नावाने आज पुरस्कार प्रदान करण्यात आले. सीरम इन्स्टिट्युटचे आदर पूनावाला यांना हा पुरस्कार देण्यात आला. भारती सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल व भारती विद्यापीठ स्टुडंट हौसिंग कॉम्प्लेक्सचे उद्घाटन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, हिमाचलचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांच्या हस्ते भारती विद्यापीठ शैक्षणिक संकुल येथे पार पडले. याप्रसंगी बोलताना शरद पवार यांनी पतंगराव कदम यांच्या आठवणी जागवल्या.

Sharad Pawar
Teachers Constituency : नवख्या किरण पाटलांचा अनुभवी विक्रम काळेंशी सामना ...

शरद पवार म्हणाले, "पंतगराव कदमांनी जी काही संस्थात्मक उभारणी केली, आणि त्या माध्यमातून सामान्य माणसाची सेवा करण्याची काळजी आयुष्यभर घेतली. त्या विचारातूनच भारती विद्यापीठाची कामगिरी होत आहे. शून्यातून त्यांनी उभं केलं. सांगली जिल्ह्यातील एका लहानग्या गावात त्यांचा जन्म झाला. भारती विद्यापीठाची स्थापना करून त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात पाऊल टाकलं. "

"पुणे हे शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं. अनेक संस्था या ठिकाणी आहेत. शंभर शंभर वर्षांची परंपरा आहे. मात्र एका खेड्यातून एक व्यक्ती या पुण्यात येथे, कसलीही पार्श्वभूमी तिला नसते. आणि अशी संस्था उभी करण्याचा निर्णय घेते. पुण्यात इतक्या संस्था असताना,आपली एकदर्जेदार संस्था उभी करण्याचं काम करते, कर्तुत्व दाखवते, अशी व्यक्ती पाहायला मिळणार नाही, पण आमचं भाग्य आहे की, पंतगरावांच्या रूपाने आम्हाला पाहायला मिळालं," असे गौरवोद्गार पवार यांनी काढले.

"पंतगराव कदम शिक्षणक्षेत्रात उत्तम काम करणारे द्रष्टे होते. सार्वजनिक जीवनात त्यांना आस्था होती. विधिमंळात आमच्यासोबत त्यांनी काम केलं. 'शेतीसाठी पाण्याचा प्रश्न' या विषयाचे जाणकार म्हणून त्यांचा लौकिक होता. अशा व्यक्तीने या संस्था उभं केल्यानंतर त्यांच्याबद्दल अभिमान वाटतो," असे पवार म्हणाले.

"पतंगराव कदम यांचा अनेक वर्षांचा कालखंड रयत शिक्षण संस्थेत गेला. कर्मवीर भाऊराव पाटलांनी एक आदर्श घालून दिला. रस्ता दाखवला. गेली पन्नास वर्ष मी रयतची जबाबदारी घेतो. आम्हा लोकांचा खंदा पुरस्कर्ता, पाठीराखा पतंगराव कदम होते. ते रयत संस्थेत सातत्याने लक्ष देत असत. त्यांनी भारती विद्यापीठ काढली, ती वाढवली, पण त्यांची खरी निष्ठा रयतसोबत होती. रयतशी बांधिलकी त्यांनी कधी सोडली नाही. रयतमध्ये त्यांचं योगदान फार मोठे होते," असेही पवार म्हणाले.

Sharad Pawar
Ncp News : विधान परिषद निवडणुुकीसाठी राष्ट्रवादी अॅक्शन मोडवर, दिग्गज नेत्यांची बैठक!

"पंतगराव कदम यांच्या नावाने आज पुरस्कार ज्यांना दिला ते आदर पुनावाला, त्याच्या संस्थेचं नाव सीरम इन्स्टिट्युट. आदर ९ वर्षाचे असतील तेव्हापासून त्यांच्या कुंटुबासोबत माझा घनिष्ठ संबंध आहे. आदरचे वडील आणि मी एका वर्गात शिकलो. आम्ही अभ्याससोडून बाकीच्या क्षेत्रातच लक्ष देत होतो. आम्ही एका गोष्टीत मात्र सातत्य ठेवलं. कॉलेजमधून बाहेरपडेपर्यंत आम्हाला ३६ ते ४० पर्यंत मार्क मिळवले, " असा किस्सा ही पवारांनी सांगितले.

'आज पूनावाला यांच्या कर्तुत्वाचा लोकांना अनुभव आला. सीरमने व्हॅक्सिन तयार केलं. आज जगामध्ये जन्म घेणाऱ्या शंभर मुलांपैकी ५० मुलं सीरमचं व्हॅक्सिन घेतात. जवळपास १६० देशात सीरमचं व्हॅक्सिन वापरलं जातं. ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की, सीरमसारखी संस्था सायरस पूनावाला यांनी पुण्यात उभी केली. या संस्थेचा सगळा कारभार आता आदर सांभाळतात. आनंद आहे की, ते वडीलांची गादी उत्तम रितीने चालवतात, असे पवार म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com