Sharad Pawar Resigns As NCP Chief : पुणे शहराध्यक्षसह सर्व पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; पवारांनी निर्णय मागे घेण्याची मागणी !

NCP President Sharad Pawar Resign Live Updates : भक्तांच्या श्रद्धेसाठी देवाला देवपण सोडता येत नाही...
Sharad Pawar Resigns As NCP Chief :  Pune NCP
Sharad Pawar Resigns As NCP Chief : Pune NCPSarkarnama

Sharad Pawar Resigns As NCP Chief : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्ष पदावरून पायउतार होणार असे जाहीर केले आणि राज्यभरात पदाधिकाऱ्यांचे राजीनामे सत्र सुरू झाले आहे.पवारांच्या या निर्णयानंतर धाराशिव, बुलढाण्याच्या शहराध्यक्ष यांनी राजीनामा देणार असे जाहीर केले होते.

पवारांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्यभरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून विरोध सुरू आहे. आता पुणे शहरातसुद्धा राजीनामा सत्र सुरू झाले आहे. पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह सर्वच पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देत असल्याचे सांगितले आहे.

Sharad Pawar Resigns As NCP Chief :  Pune NCP
Sushama Andhare On NCP : 'मी राष्ट्रवादीची सदस्या नव्हते, पण बहुजन-उपेक्षितांची बुज असणारा नेता.." ; अंधारेंचं भावूक पत्र !

पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर कार्यालयाच्या बाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्रित येत पवारांनी हा निर्णय मागे घेण्यातयावा, यासाठी एकत्रित आले होते.

दरम्यान, पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या, "कितीही इच्छा झाली तरी किमान भक्तांच्या श्रद्धेसाठी देवाला देवपण सोडता येत नाही, अगदी तसंच पवार साहेबांनीही अध्यक्षपद सोडू नये. साहेबांनी आपली भूमिका न बदलल्यास माझ्यासह पुणे शहर कार्यकारणीतील तमाम सदस्य राजीनामा देत आहोत, जिथे आमचा देव नाही तिथे आमचा नमस्कारही नाही." अशा आशयाचं ट्वीट जगतार यांनी केले होते.

पक्षाच्या प्रवक्त्या रुपाली पाटील यावेळी बोलताना म्हणाल्या, 'देशातील राजकारणाच्या पटलावर शरद पवार हेच सर्वोच्च स्थानी असलेले नेते आहेत. पवारसाहेब हे सत्तेमध्ये असो किंवा नसो, त्यांच्या सल्ला मिळावा, मार्गदर्शन घेण्यासाठी सर्वच राजकीय पक्षातले नेते साहेबांना भेटत असतात. पण त्यांनी अचानकपणे आज अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला. आमच्यासाठी हे सर्व धक्कादायक होतं. हा निर्णय साहेबांनी मागे घ्यानिवृत्त होण्याचा निर्णय साहेबांनी मागे घ्यावा, असे त्या म्हणाल्या.

Sharad Pawar Resigns As NCP Chief :  Pune NCP
Sharad Pawar Resigns As NCP Chief : शरद पवारांनी निर्णय मागे घेण्याच्या मागणीसाठी उपोषण; कार्यकर्ते भावूक..

शरद पवार यांनीच आम्हाला कायम मार्गदर्शन देत राहावं, अशीच आमची मागणी आहे. देशभरातील कार्यकर्त्यांची हीच मागणी आहे. जोपर्यंत शरद पवार त्यांच्या या निर्णयाचा पुनर्विचार करावा, त्यांनी आपला निर्णय मागे घ्यावा, त्यांच्या या भूमिकेमुळे आम्ही सर्वजण राजीनामा देत असल्याचे सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com