
Pune News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते युगेंद्र पवारांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने युगेंद्र पवारांच्या वाढदिवस साजरा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थान असलेल्या गोविंद बागेमध्ये कार्यकर्ते जमले होते. शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये युगेंद्र पवारांचा वाढदिवस होता व्हावा अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती. यावेळी शरद पवारांच्या (Sharad Pawar) उपस्थितीमध्ये केक कापला यावेळी शरद पवारांनी मार्गदर्शन केले.
शरद पवार म्हणाले, आज युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांचा वाढदिवस आहे. माझ्या उपस्थितीत केक कापावा अशी सर्वांची इच्छा होती याचा आनंद आहे. जमाना बदलतोय, छोट्या गावात वाढदिवस साजरा करण्यात येतात आणि त्या निमित्ताने लहान गावी केक यायला लागले आहेत. मला आठवतं माझ्या लहानपणी वाढदिवस असला की, गुळ-शेंगदाणे किंवा गुळ-खोबरे दिलं जायचं.आता ते सगळे दिवस बदलले असल्याचेही पवारांनी यावेळी सांगितले.
मला आनंद आहे की, तुम्हा लोकांसोबत युगेंद्रने काम करायला सुरुवात केली आहे. त्याचा स्वभाव लोकांशी नम्रतेने बोलण्याचा आहे. आणि आपल्या परीने जे करायचं ते करण्याचा तो प्रयत्न करत असतो. तुम्ही युगेंद्रची तुलना अजित पवार आणि माझ्यासोबत करू नका, असा सल्लाही शरद पवारांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला.
आम्ही काम करायचं तेव्हा सरकार आमच्या हातात असायची. मात्र, आता युगेंद्रच्या हातात सरकार नाही. युगेंद्र यांच्या हातात सध्या कष्ट करायचे आणि माणुसकीने माणसं आपलीशी करून त्यांच्याशी जास्तीत जास्त संपर्क ठेवण्याचा आहे. यासाठी तुमच्या सर्वांची साथ युगेंद्र यांना आवश्यक आहे. त्यामुळे सत्तेचा विचार आपण आज तरी करू नये, असं शरद पवार म्हणाले.
शरद पवार म्हणाले, मी युगेंद्राला आत्ताच सांगितलं एकट्याचे अभिनंदन किती दिवस करायचे. आम्हाला अक्षता टाकायच्या आहेत, आता लांबवू नका. राजकीय जीवनात शेवटी आधार महत्त्वाचा असतो तो घरातल्या पेक्षा कुठं मिळत नसतो, असा मोलाचा सल्लाही शरद पवार यांनी यावेळी युगेंद्र पवारांना दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.