Sharad Pawar : शिंदे-फडणवीस-अजितदादाही घरी बसणार ? शरद पवारांचे एकच टार्गेट विधानसभा

Sharad Pawar Target to Win the Assembly Election : गेली पाच वर्ष सरकार चालवले पण सत्तेच्या विकेंद्रकरणाचे सूत्र वापरले नाही, असे पवार म्हणाले.
Ajit Pawar, Narendra Modi Eknath Shinde Sharad Pawar
Ajit Pawar, Narendra Modi Eknath Shinde Sharad Pawarsarkarnama

Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीत बारामतीपासून महाराष्ट्रात जिथे कुठे; ज्येष्ठ नेते शरद पवार आणि ठाकरे उमेदवार देतील, तिथे त्यांना हरविण्यासाठी पेटून उठलेल्या शिंदे-फडणवीस-अजितदादांना निकालातून धडा मिळाला. यामागे पवार-ठाकरेंच्या व्यूहनीती कामाला आली आणि आघाडीचे पारडे प्रचंड जड झाले. या निकालानंतर ठाकरे-पवारांनी पुन्हा उचल खाल्ली आणि विधानसभेच्या निवडणुकीतही शिंदे-फडणवीस-अजितदादांना पराभूत करण्याचा डाव आहे. त्यातून विधानसभा निवडणुकीनंतर आमचीच सत्ता येणार असल्याचे सांगून पवारसाहेबांनी महायुतीला बजावून सांगितले.

यानिमित्ताने फोडाफोडी करणाऱ्यांना घरी बसविण्याचा इशाराच पवारसाहेबांनी दिला. राजकारणात पवारसाहेब जे काही बोलून दाखवतात, ते करूनही दाखवतात, याचा अंदाज असलेल्यांना सत्ताधीशांना आतापासून तयारी करावी लागणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिना निमित्त पुणे शहर कार्यालयात कार्यक्रम पार पडला. त्यावेळी मार्गदर्शन करताना शरद पवारांनी एक लक्ष विधानसभा असे ठणकावून सांगितले. 'तीन महिन्यांनी महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक येईल. तुमची, माझी सगळ्यांची जबाबदारी. आता एकच लक्ष, ते म्हणजे तीन- चार महिन्यांनी निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महाराष्ट्राची सत्ता तुमच्या हातात असेल, अशी भूमिका घेऊ. या सत्तेचा उपयोग जास्तीत जास्त लोकांना, शेवटच्या घटकांपर्यंत कसा होईल याची काळजी घेऊ," असा निर्धार शरद पवारांनी व्यक्त केला.

Ajit Pawar, Narendra Modi Eknath Shinde Sharad Pawar
Modi 3.0 Cabinet: मोदींचा राजीनामा नाही; केजरीवालाचं भाकीत खोटं ठरणार?

सामान्य माणूस शहाणा

गेली पाच वर्ष सरकार चालवले पण सत्तेच्या विकेंद्रकरणाचे सूत्र वापरले नाही. गेल्या पाच वर्षात दोन व्यक्तींनी सरकार चालवले, सुदैवाने देशातील जनतेने याची नोंद घेऊन त्याप्रकारे मतदान केले, त्यामुळे सामान्य माणूस तुमच्या माझ्यापेक्षा अगदी शहाणा आहे. जागरुक आहे, असे शरद पवार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com