Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा 'ॲक्टिव्ह मोड'वर; म्हणाले, माझी प्रकृती आता व्यवस्थित...

Maratha & OBC Reservation News : " जर सरकारने दिरंगाई केली तर आम्ही..."
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSarkarnama

Chhatrapati Sambhajinagar : मराठा आरक्षणासाठी सुरू केलेले बेमुद्त उपोषण मनोज जरांगे पाटील यांनी मागे घेतले होते. त्यानंतर त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगरमध्ये उपचार सुरू होते. सरकारनेदेखील मराठा आरक्षणासाठी आक्रमक पावले उचलण्यास सुरुवात केल्यानंतर जरांगेंनी समाधानही व्यक्त केले होते.

पण याचवेळी मंत्री छगन भुजबळ यांच्यासह ओबीसी नेते ओबीसीमधून मराठा आरक्षण देण्याविरोधात आक्रमक झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा ॲक्टिव्ह मोडवर आले आहेत. त्यांनी ओबीसी नेत्यांसह सरकारला पुन्हा आपल्या स्टाइलने थेट इशारा दिला आहे.

Manoj Jarange Patil
Rahul-Varun Meets : राहुल गांधी-वरुण गांधींची केदारनाथमध्ये भेट, राजकीय तर्कवितर्कांना उधाण

मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) बुधवारी छत्रपती संभाजीनगर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. सरसकट कुणबी जात प्रमाणपत्राबाबत त्यांनी सरकारला आठवण करून दिली आहे. ते म्हणाले, सरकारने जर २४ डिसेंबरपर्यंत जर आम्हाला आरक्षण दिलं नाही तर कोण कोण नेते ओबीसीमध्ये २० वर्षांपासून आहेत आणि आपलं आरक्षण कुणी दिलं नाही, ती नावं जाहीर करणार आहोत, असल्याचा इशाराही त्यांनी या वेळी दिला.

आज पूर्ण ताकदीने सरकार...

जरांगे पाटील म्हणाले, सरकारकडून मराठा समाजासाठी सरकारकडून जोरदार काम सुरू आहे. मराठ्यांच्या पदरात प्रमाणपत्रं पडू लागली आहेत. जेव्हा नाराजी व्यक्त करायची होती, तेव्हा आम्ही ती व्यक्त केली, पण आज पूर्ण ताकदीने सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आणि कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात काम करत असल्याचे म्हणत जरांगेंनी सरकारच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आमचं हक्काचं आरक्षण जे आहे ते आम्हाला मिळणार आहेच. जे विरोध करत आहेत, त्यांनी सांगावं की नेमका विरोध कशासाठी? आमच्या हक्काच्या सुविधा आहेत आणि जे ओबीसींना (OBC Reservation) मिळतं, त्या सुविधा आम्हाला मिळाव्यात, अशी मागणीही जरांगेंनी या वेळी केली.

"माझी प्रकृती आता व्यवस्थित..."

तसेच माझी प्रकृती आता व्यवस्थित झाली आहे. मी पुढच्या दोन तीन दिवसांत माझं काम पुन्हा सुरू करणार आहे. मराठा समाजासाठी सरकारकडून जोरदार काम सुरू असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. या वेळी त्यांनी जिल्ह्यांमध्ये मराठा समाजाला प्रमाणपत्र देण्यासाठी सरकारकडून कक्षही सुरू करण्यात आले आहेत. यावरून लक्षात येतं आहे की, सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी दिरंगाई करत नाही. जर त्यांनी दिरंगाई केली तर आम्ही सावध आहोतच, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.

Manoj Jarange Patil
Amit Shah News : मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थोडक्यात बचावले; राजस्थानमध्ये प्रचार सभेत जात असतानाच...

मराठा आणि ओबीसींमध्ये भांडण लावण्याचं काम...

मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) मनोज जरांगेंनी सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. ते म्हणाले, ओबीसी नेते एकवटले असतील, मात्र सामान्य ओबीसींना हे माहीत आहे की आमचे पुरावे मिळत आहेत. आम्ही ओबीसींचं आरक्षण घेत नाही. जे आमचं आहे तेच घेत आहोत. आमची बाजू सत्य असल्यानेच सरकार हे करतं आहे, असंही जरांगे पाटील म्हणाले. मात्र, ओबीसी बांधवांना माहीत आहे, की आमच्याकडे पुरावे आहेत. मराठा आणि ओबीसींमध्ये भांडण लावण्याचं काम ओबीसी नेते करत आहेत हे हेच लोक म्हणत आहेत कारण त्यांना वस्तुस्थिती समजली असल्याचेही जरांगेंनी सांगितले.

(Edited By Deepak Kulkarni)

Manoj Jarange Patil
Raj Thackeray New: राज ठाकरेंच्या शिलेदारांचा इगतपुरीत अनपेक्षित चौकार!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com