Sharad Pawar On Dilip Walse : दिलीप वळसे पाटील संधीसाधू, आता उत्तर शोधण्याची वेळ; शरद पवारांचा कडक इशारा

Ambegaon Assembly Constituency : 35 वर्षे आमदार, त्यापैकी 25 वर्षे मंत्री आहेत. आता ज्यांना 25 वर्षांत विकास करता आला नाही.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune Political News : मंत्री दिलीप वळसे पाटील हे ज्येष्ठ नेते शरद पवारांचे जवळचे मानले जात होते. मात्र राष्ट्रवादी फुटीनंतर वळसे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची साथ दिली. आता विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवारांनी पुणे जिल्ह्याचा दौरा करत आहेत. त्यानुसार पवार हे जुन्नरला होते.

तेथून त्यांनी दिलीप वळसे Dilip Walse हे संधीसाधू असून त्यांनी जनतेला न्याय दिला नाही. आता त्याला उत्तर शोधावे लागेल, असे सूचक विधान करत पवारांनी आंबेगावात भाकरी फिरवण्याचे संकेत दिले आहेत.

आंबेगाव तालुक्यातील 40 टक्के भाग दुष्काळी आहे. त्यातच डिंबे धरणाला बोगदा पाडून येथील पाणी कर्जत-जामखेडला नेण्याचा घाट घातला जात असल्याची टीका होत आहे. त्यावर पवारांनी, या तालुक्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन इतर तालुक्यांच्या पाण्याची पूर्तता केली पाहिजे, असे स्पष्ट पवारांनी Sharad Pawar व्यक्त केले.

मात्र ज्या राजकीय लोकांनी अलिकडे निर्णय घेतले, त्याला उत्तर देण्यासाठी त्यांच्याकडे मुद्दे नाहीत. त्यातूनच इतर मुद्दे उपस्थित केले जात आहेत. गेल्या 30-40 वर्षांपूर्वी तालुक्यात पाण्याची स्थिती आणि आताची स्थिती यात बदल झाला आहे, याकडे लक्ष वेधत पवारांनी कारण नसताना शाहण्यांनी वादाचे प्रश्न उपस्थित करू नये, असे आवाहनही केले.

दरम्यान, वळसे पाटील यांनी तालु्क्यातील पाण्यासाठीच आपण सत्तेत सहभागी झाल्याचा दावा केला आहे. मात्र तालुक्यातील अनेक प्रश्न सुटले नसल्याचा आरोप होत आहे. अनेक वर्षे तुमच्या राजकारण करणारे दिलीप वळसेंनी आंबेगावातील प्रश्न सोडवले नाहीत का? असा थेट प्रश्न पवारांना विचारण्यात आला. यावर पवारांनी वळसेंवर जोरदार टीका केली.

Sharad Pawar
Ajit Pawar Birthday : विधानसभेची खबरदारी! विदर्भात अजितदादांच्या राष्ट्रवादीचं मोठं पाऊल

ते म्हणाले, तालुक्यातील विकासाबाबत त्यांनाच विचारा. मुळात ते किती वर्षे सत्तेत आहेत? 35 वर्षे आमदार, त्यापैकी 25 वर्षे मंत्री आहेत. आता ज्यांना 25 वर्षांत विकास करता आला नाही, ते आता काहीतरी सांगतात. मुळात हा संधीसाधू पणा आहे. अनेकांना अनेक वर्षे संधी देऊनही त्यांना कामे करता आलेली नाहीत. जनतेला न्याय देता आलेले नाही. याला उत्तर आता शोधावे लागेल. यासाठी राज्याची सत्ता हातात घ्यावी लागेल, असेही पवारांनी स्पष्ट केले.

Sharad Pawar
Raju Shetti News : लोकसभेच्या पराभवानंतर विधानसभेसाठी राजू शेट्टींचा 'प्लॅन' तयार, तिसऱ्या आघाडीच्या हालचाली

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com