Raju Shetti News : लोकसभेच्या पराभवानंतर विधानसभेसाठी राजू शेट्टींचा 'प्लॅन' तयार, तिसऱ्या आघाडीच्या हालचाली

Swabhimani Shetkari Sanghatna Politics : महाविकास आघाडी आणि महायुतीवर कडाडून टीका करत राजू शेट्टी यांनी तिसरी आघाडी करणार असल्याची घोषणा केली. या दोन्ही सरकारकडून सर्वसामान्य माणसाच्या अपेक्षाभंग झाले आहेत.
raju shetti
raju shettisarkaranama
Published on
Updated on

Mumbai News : लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आगामी विधानसभा निवडणुकीचा प्लॅन तयार केला आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तिसरी आघाडी करून निवडणुकीला सामोरे जायचा प्लॅन शेट्टी यांनी आखला आहे. त्याबाबतची घोषणा नुकतीच राजू शेट्टी यांनी केले आहे.

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी व महायुतीला अडचणीत आणण्याची रणनीती आखली जात आहे. छोटे पक्ष, शेतकरी व सामाजिक संघटनांना सोबत घेऊन आगामी विधानसभेला राज्यात तिसरी आधाडी करणार असून, यातून राज्यात दबाव गट तयार करणार असल्याची माहिती राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी दिली.

महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) आणि महायुतीवर कडाडून टीका करत राजू शेट्टी यांनी तिसरी आघाडी करणार असल्याची घोषणा केली. या दोन्ही सरकारकडून सर्वसामान्य माणसाच्या अपेक्षा भंग झाले आहेत. महागाई बेरोजगारीसारखे अनेक प्रश्न असताना त्याकडे लक्ष द्यायला सरकारला वेळ नाही.

या दोन्हीही सरकारकडे छोट्या पक्षांना वापरून फेकून देण्याची सवय लागली आहे. महायुतीला राज्यातील छोटे मोठे पक्ष संपवायचे आहेत. त्यामुळे तिसरी आघाडी करणार असल्याचं शेट्टी यांनी जाहीर केले. पहिल्या टप्यात 'स्वाभिमानी', शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटना व "बीआरएस' एकत्र आलो आहे. इतर पक्ष व संघटनांसोबत चर्चा सुरू असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

raju shetti
Ajit Pawar Birthday : विधानसभेची खबरदारी! विदर्भात अजितदादांच्या राष्ट्रवादीचं मोठं पाऊल

कोल्हापूर आणि सांगलीत सर्व जागांवर लढणार

आगामी विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघ आणि सांगली जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटना उमेदवार देणार असल्याचे त्यांनी सांगितलं.

राजू शेट्टी यांच्या या घोषणेमुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारांची आत्तापासूनच धाकधूक वाढली आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उमेदवार गृहीत धरूनच महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी चाचपणी सुरू केली आहे.

raju shetti
Rashmi Barve : रश्मी बर्वेंचं बॅड लक? आधी लोकसभेची निवडणूक लढवण्यापासून वंचित, तर आता 'झेडपी'चा मार्गही बंद

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com