Uddhav Thackeray maharashtra vidarbha tour live updates : राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेत फूट पडल्याने या पक्षांचे प्रमुख शरद पवार व उद्धव ठाकरे आता मैदानात उतरले आहेत.
शरद पवार यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला शनिवारपासून सुरूवात झाली.त्यांनी येवला येथून रणशिंग फुंकले. आजपासून (रविवार) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचामहाराष्ट्र दौरा सुरू झाला आहे. दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यासाठी उद्धव ठाकरे आज सकाळीच मुंबईहून रवाना झालेआहेत. उद्धव ठाकरे यांची यवतमाळ येथे पत्रकार परिषद झाली.
"गेल्या अनेक दिवसांपासून पोहरादेवीचे दर्शन घेण्याची इच्छा होती. मागे महाविकास आघाडीच्या ज्या काही सभा झाल्या, त्यादरम्यान येथे सभा झाली नाही, यानिमित्ताने हा कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी हा दौरा आहे," असे ठाकरे म्हणाले.
अजित पवार हे यांनी शिंदे-भाजप सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. अजितदादांच्या या बंडाबाबत एका प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, "पूर्वी पक्ष फोडला जायचा, आता पक्ष पळवला जातोय. मात्र, महाराष्ट्राच्या जनतेला हे पटलेले नाही. त्यामुळे शिवसेनेच्या बंडानंतर अनेक जण मला सांगत आहे की, उद्धवजी आम्ही तुमच्यासोबत आहे. कार्यकर्त्यांचे काय म्हणणे आहे, हे समजून घेण्यासाठी मी महाराष्ट्र दौऱ्यावर आहे,"
उद्धव ठाकरे म्हणाले, "राज्यात आघाडीचे सरकार असताना अजित पवार व राष्ट्रवादीने आमच्यावर अन्याय केला. म्हणून आम्ही मविआतून बाहेर पडलो, असे शिंदे गट सांगत होता. आता त्याच राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मांडीच्या मांडी लावून ते पुन्हा सत्तेत बसले आहेत. यावरुन शिंदे गटाचे ढोंग आता उघडे पडले आहे,"
"सध्या अनेकांना मुख्यमंत्री बनण्याची हौस आहे. मात्र, सत्तेच्या या साठमारीत सामान्यांना काय मिळणार आहे? शेतकऱ्यांना काय मिळणार आहे? शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतच आहेत. त्या रोखण्यासाठी काही पाऊले उचलणार आहात की नाही?," असा सवाल ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना केला.
ठाकरेंच्या या दौऱ्यातून शिंदे गटात गेलेले आमदार संजय राठोड यांना ठाकरे गटाकडून आव्हान दिले जाणार आहे. सध्याच्या राजकीय घडामोडीनंतर उद्धव ठाकरे हे प्रथमच जाहीर कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी संवाद साधणार आहे. त्यामुळे ते राष्ट्रवादीच्या फुटीवर काय भाष्य करतात, याकडे सगळ्याचे लक्ष आहे.
(Edited By : Mangesh Mahale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.