महाराष्ट्रातील राजकारण शरद पवारांच्या नावाशिवाय आणि बारामतीशिवाय पुढे सरकत नाही. याची प्रचिती वारंवार येत असते. आताही असंच घडलंय. शरद पवार बारामती मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा आहे. याबाबत काहींनी दावेदेखील केले आहेत. याबाबत शरद पवार गटाचे प्रशांत जगताप यांना महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष आणि खासदार शरद पवार (Sharad Pawar) बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार, अशी चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे. या चर्चेला शरद पवारांचे शिलेदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी पूर्णविराम दिला आहे.
शरद पवार कोणतीही निवडणूक लढवणार नाहीत, असे प्रशांत जगताप यांनी स्पष्ट केले आहे. शरद पवार यांनीच 2019 मध्ये लोकसभा निवडणूक (Loksabha Election) लढवणार नाही, असे जाहीर केले होते. शिवाय राज्यसभेची ही टर्म पूर्ण झाल्यानंतर पुन्हा राज्यसभेची (Rajyasabha) निवडणूक लढवणार नाही, असेही स्पष्ट केले आहे. तरीही त्यांच्याबाबत मुद्दामहून अफवा पसरवल्या जातात, असे प्रशांत जगताप यांनी सांगितले. (Rumors about Sharad Pawar)
राजकीय जीवनामध्ये कोणते निर्णय घ्यायचे, कधी घ्यायचे याबाबत शरद पवारांना इतरांच्या सल्ल्याची गरज कधीच पडली नाही. पण शरद पवाराचं नाव घेतल्याशिवाय राजकारणात पुढे जाता येत नसल्यामुळे विविध पक्षांमध्ये तशी स्पर्धा लागली आहे आणि शरद पवार बारामतीतून निवडणूक लढवणार अशी अफवा पसरवण्यात आली, असा दावा प्रशांत जगताप यांनी केला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
बारामती मतदारसंघातून खासदार सुप्रिया सुळेच निवडणूक लढवणार आहेत. 15 वर्षांपासून त्या या मतदारसंघाची सेवा करत असून या मतदारसंघातील प्रश्न त्यांनी हिरिरीने लोकसभेत मांडले आहेत. त्यामुळे त्या मतदारसंघांमध्ये उमेदवार बदलण्याचा प्रश्नच येत नाही, असे प्रशांत जगताप यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, शरद पवार भावनिक राजकारण करणारे नेते नाहीत. त्यांचं कर्तृत्व खूप मोठं आहे. वय, आजारपण याचं भांडवल त्यांनी वीस वर्षांपूर्वीही राजकारण केलं नाही. त्यामुळे मतदारांना भावनिक करून निवडणुका जिंकण्याचा त्यांचा कोणताही मानस नाही, असे प्रशांत जगताप यांनी स्पष्ट केले.
(Edited by Avinash Chandane)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.