Sushma Andhare: बालगंधर्व रंगमंदिर पाडण्याविरोधात सुषमा अंधारे आक्रमक; दिला 'हा' इशारा

Balgandharva Rangmandir: पुणे शहरातील बालगंधर्व रंगमंदिर पाडण्याचा घाट घातला जात आहे.
Sushma Andhare
Sushma AndhareSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुणे शहरातील बालगंधर्व रंगमंदिर पाडण्याचा घाट घातला जात आहे. राज्याचे नवनियुक्त मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांनी काही दिवसांपूर्वी याबाबत जाहीर वक्तव्य देखील केले होते. बालगंधर्व पाडण्याचे फिक्स झाले असून पुढील तीन वर्षात या ठिकाणी नवीन वास्तू उभी राहील, असे वक्तव्य डॉ.करीर यांनी केले होते. बालगंधर्व पाडण्यास ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी विरोध केला आहे.

बालगंधर्व रंगमंदिरात अनेक कलाकारांची पोटे भरत आहेत. केवळ कलावंत नव्हे तर निर्माते स्टेज व्यवस्थापन यासह रंगमंचावर विविध जबाबदारी पार पाडणाऱ्यांचं पोट यावर अवलंबून आहे. हे रंगमंदिर पाडल्यानंतर त्याचे काम पूर्ण होईपर्यंत या लोकांनी कुठे जायचे. त्यांच्यासाठी राज्य सरकारने किंवा महापालिकेने काय नियोजन केले आहे ? याचा खुलासा पहिल्यांदा करावा, त्यानंतरच हे रंगमंदिर पाडण्याचा विचार करा, असा इशारा सुषमा अंधारे यांनी दिला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sushma Andhare
Raju Shetti News : नार्वेकरांनी दिलेल्या निकालावर राजू शेट्टी म्हणाले, 'जरा वेश बदलून लोकांमध्ये जा...'

बालगंधर्व रंगमंदिर पाडण्यापूर्वी आवश्यक तो खुलासा न झाल्यास या विरोधात शिवसेनेच्यावतीने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सुषमा अंधारे यांनी दिला आहे. बालगंधर्व रंगमंदिर पाडण्याचा प्रस्ताव सहा वर्षांपूर्वी स्थायी समिती अध्यक्ष असताना मुरलीधर मोहोळ यांनी महापालिकेत ठेवला होता. बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकास करण्याचा हा प्रस्ताव होता. मात्र, त्यावेळेस कलावंत तसेच रंगभूमीसाठी आपली सेवा देणाऱ्या अनेक व्यक्तींनी याला कडाडून विरोध करत या विरोधात आंदोलन देखील केले होते.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील बालगंधर्व रंगमंदिर पाडण्यास विरोध दर्शविला होता. याला होत असलेला विरोध लक्षात घेता महापालिकेने हा प्रस्ताव थांबवला होता. काही दिवसांपूर्वी राज्याचे नवनियुक्त मुख्य सचिव डॉ. करीर एका कार्यक्रमासाठी बालगंधर्व येथे आले असता, लवकरच बालगंधर्व रंगमंदिर पाडले जाईल. बालगंधर्व पाडण्याचे नियोजन झाले असल्याचेही त्यांनी सांगितले होते. डॉ.करीर यांनी घेतलेल्या भूमिकेला अंधारे यांनी विरोध दर्शविला आहे.

चांगली वास्तू पाडून तेथे उधळपट्टी करण्याचा राज्य सरकारचा आहे. पाडापाडी करायची आणि पैसे कमवायचे असा उद्योग सुरू असून बालगंधर्व रंगमंदिर कशासाठी पाडायचे ? पडल्यानंतर ते उभे राहण्यासाठी ते तीन वर्ष लागणार आहे त्यामध्ये कलावंत तसेच इतर जे सर्व मंडळी आहेत, ज्यांचे यावर पोट आहे, त्यांची व्यवस्था काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

मुख्य सचिव डॉक्टर नितीन करीत म्हणतात की आमचे सर्व ठरले आहे, याबाबत अंधारे यांना विचारले असता त्या म्हणाल्या, टेंडर कोणाला द्यायचे, ठेकेदार कोण त्यातून पैसे किती खायचे, याचे सर्व ठरलेच असणार ना? हे सरकार धनिक आणि भांडवलदारांसाठी फायदा कसा होईल, यामध्येच गुंतले आहे. मात्र बालगंधर्व रंगमंदिर आणि पाडू देणार नाही.

(Edited By- Ganesh Thombare)

Sushma Andhare
Abdul Sattar : मंत्री अब्दुल सत्तारांचं मोठं विधान; म्हणाले, 'पुणे बाजार समितीतील कोट्यवधींचा घोटाळाच मी...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com