Sharad Pawar news : कसब्याच्या निकालावर शरद पवारांचे सूचक विधान, कसबा....

देशातील अनेक भागामंध्ये भाजप नाही
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama

Sharad Pawar news : पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीत कॉंग्रेसला चांगली मतं मिळाली. निवडणुकीची टक्केवारीही चांगली होती. कसबा कोणाचा गड होता आणि लोकांनी काय निर्णय़ घेतला, हे या निवडणुकीतून स्पष्ट झालं, अशी प्रतिक्रीया राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. आज सकाळी बारामतीत त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

शरद पवार म्हणाले की, कसबा पोटनिवडणुकीतून एक गोष्ट स्पष्ट होते की, सत्तेत असून भाजपला यश मिळालं नाही. पोटनिवडणूक आणि विधानपरिषदेत भाजपला यश मिळालं नाही, लोक वेगळा विचार करु लागलेत. पुण्याची निवडणूक ही काय सांगायची गरज नाही हे जगजाहीर आहे की कसबा कुणाचा गड होता आणि लोकांनी काय निर्णय घेतला आणि या पार्श्वभूमीवर काय निकाल लागला, हा बदलाचा मुड तयार होतोय. हा चेंज बदलासाठी अनुकूल आहे. असं वाटतयं.

Sharad Pawar
Sandeep Deshpande : संदीप देशपांडे हल्ला प्रकरणात दोन जण पोलिसांच्या ताब्यात

देशात २०१४ च्या आधी प्रमाणे वातावरण तयार होतयं का, यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, मला स्वत:ला असं वाटतयं की देशात बदलाचा मुड तयार होतोय. गेल्या काही दिवसात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तीन-चार निवडणुका झाल्या. या निवडणूका काय सांगतात, भाजपला एखादं-दुसरी जागा सोडली तर फारशा जागा त्यांना मिळू शकल्या नाहीत. सरकार त्यांचं, त्यांनी निवडणूकांमध्ये पुर्णपणे आपल्या सत्तेचा वापर केला.

शरद पवार म्हणाले की, केरळमध्ये दिल्ली, हिमाचलमध्ये, हे सर्व चित्र जे दिसत आहे. ते देश बदलाचे वारे दिसत आहे. देशातील अनेक भागामंध्ये भाजप नाही, ही गोष्ट आगामी बदलासाठी अनुकूल आहे. आज केरळमध्ये भाजप नाही. कर्नाटकमध्ये आधी कॉंग्रेसची सत्ता होती. पण खासदार, आमदार फोडून तिथे भाजपची सत्ता आणण्यात आली. पुढे निवडणूका होतील तेव्हा लोक या निर्णयाचा विचार नक्की करतील. त्यानंतर आंध्र आणि हैदराबादमध्ये पाहिलं तर याठिकाणीही भाजप नाही. पंजाबमध्येही भाजप नाही. दिल्लीतही भाजप नाही, त्यानंतर हिमाचलमध्येही भाजप नाही. हे जे चित्र दिसतयं ते एकप्रकारे देशात बदलाचं वारं दिसत आहे. याचे परिणाम आगामी निवडणुकांमध्ये बघायला मिळतील अशी अपेक्षा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com