Sharad Pawar News : शरद पवारांची बारामतीकरांना साद; तुमचा निर्णय...

Political News : बारामती मतदारसंघात सकाळपासूनच सभांचा धडाका लावला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवारांचा आवाज बसला असताना ही त्यांनी येथील प्रचार सांगता सभेत जोरदार भाषण करताना बारामतीकरांची मने जिंकली.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama

Baramati News : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या प्रचाराचा रविवारी शेवटचा दिवस होता. त्यामुळे बारामती मतदारसंघात सकाळपासूनच सभांचा धडाका लावला होता . ज्येष्ठ नेते शरद पवारांचा आवाज बसला असताना ही त्यांनी येथील प्रचार सांगता सभेत जोरदार भाषण करताना बारामतीकरांना साद घातली.

या सभेच्या समारोपावेळी शरद पवारांचा (Sharad pawar) आवाज बसला असल्याने त्यामुळे त्यांना फारसे बोलता आले नाही. त्याशिवाय प्रचारासाठी हा शेवटचा दिवस असल्याने व प्रचाराची वेळ सहाला संपणार असल्याने त्यांनी भाषण आवरते घेतले. ही सभा बारामतीमधील मोरगाव रोडवरील लेंडी पट्टी येथील क्रिकेट मैदानावर पार पडली. नेहमीची सभेची जागा अडवण्यात आली असली तरी काही नुकसान होणार नसल्याचे सांगत शरद पवार यांनी टीका टिपण्णी करणे टाळले. (Sharad Pawar News)

Sharad Pawar
Abhijeet Patil : अभिजित पाटलांचा फडणवीसांना जाहीर सभेत शब्द; ‘आत एक अन्‌ बाहेर एक...’

देशाच्या दृष्टीने ही निवडणूक अतिशय महत्वाची असून या निवडणुकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. कान्हेरीतील सभेप्रसंगी एक युवक आला होता, बहुधा तो पत्रकार असावा, ही सभा कव्हर करण्यासाठी तो अमेरिकेतून आला असल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे ही निवडणूक महत्वाची ठरणार आहे.

माझ्यापूर्वी सुप्रिया सुळे यांच्यासह तिघांची भाषणे झाली. त्यामध्ये त्यांनी देशातील सध्य परिस्थिती काय आहे, देश कसा चालवण्यात येतो. त्यासोबतच देशासमोरील प्रश्न काय आहेत हे पण सांगितले. देशात मोदी यांची सत्ता असली तर आपण बारामतीकर जोपर्यंत एक आहोत, तोपर्यंत आपल्याला कोणीच काही करू शकत नाही, असेही पवार म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ही निवडणूक खूप महत्त्वाची आहे, जनतेचे प्रश्न खूप आहेत. विशेषतः महागाईचा प्रश्न आहे. त्यासोबतच शेतीचा प्रश्न आहे, हे सोडणविण्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाहीत. त्यामुळे येत्या काळात देशाला नवी दिशा प्राप्त होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व महाविकास आघाडीच्या मित्रपक्षाचे उमेदवार विजयी करावेत. सततच्या होणाऱ्या सभेमुळे माझा घसा बसला आहे. गेले काही दिवस राज्यातील १७ ते १८ जिल्ह्यात फिरलो आहे. या निवडणुकीत तुमचा निर्णय हा बारामतीकरांच्या नव्हे तर देशाच्या हिताचा असेल, हा निर्णय घेतल्यानंतर पुन्हा तुमच्याशी बोलेन असेही त्यांनी सांगितले.

Sharad Pawar
Sharad Pawar's Interview : भाजपबरोबर गेलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना सोबत घेण्याचा विचारसुद्धा करत नाही; पवारांनी ठणकावले

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com