Pune News: राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे जिल्ह्यात 'शेतकरी आक्रोश मोर्चा' काढला आहे. हा शेतकरी मोर्चा हा 30 डिसेंबरला पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. या मोर्चात हजारो शेतकरी सहभागी झाले असून या मोर्चाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवण्यात येत आहे.
याच मोर्चावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल करत 'आम्हाला लोकांनी एका विश्वासाने निवडून दिलेले आहे, त्यामुळे आम्ही सतरंजीही उचलायला तयार आहोत, आणि संसदेत सत्याचा झेंडा फडकावयाची ताकद ही आमच्यामध्ये आहे', असा इशारा खासदार सुळेंनी सरकारला दिला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
'आमच्यावर 'शेतकरी आक्रोश मोर्चा' काढण्याची वेळ आली, कारण काही महिन्यांपासून आम्ही अस्वस्थ आहोत. सहा महिन्यांपूर्वी मी स्वत: मंत्री पीयूष गोयल यांना ट्वीट करत आणि भेट घेत सांगितलं होतं की कांद्याचा प्रश्न अडचणीचा असणार आहे. त्यामुळे तुम्ही धोरणव्यवस्थितपणे आखा. मात्र, त्यानंतर माझ्यावर प्रचंड टीका झाली, आज काद्यांची परिस्थिती खूपच वाईट आहे. मोदी सरकार आणि राज्य सरकार हे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे काम करत आहे', अशा कडक शब्दात खासदार सुळेंनी सुनावलं.
अधिवेशनावेळी करण्यात आलेल्या खासदारांच्या निलंबनामध्ये खासदार सुप्रिया सुळे यांचंही निलंबन करण्यात आलं होतं. या संदर्भात बोलताना त्या म्हणाल्या, 'भाजप सरकार हे महिला विरोधी सरकार आहे. त्यामुळे आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. पण यामुळे आपली जबाबदारी अजून वाढते'.
'शेतकरी आक्रोश मोर्चा'च्या माध्यमातून आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून जनतेची सेवा करायला आम्ही येथे आलो आहोत. लोकप्रतिनिधी म्हणजे लोकांचे प्रतिनिधी, लोकांचे सेवक. आम्ही लोकांचा आवाज म्हणून दिल्लीत बोलतो. आम्ही काल्पनिक बोलत नाहीत. आम्ही सत्य बोलतो. पण सत्तेतील लोकं काल्पनिक बोलतात, असा निशाणा सुळेंनी सरकारवर साधला.
रस्त्यावरची लढाई का लढावी लागतेय ? याबाबतचं कारण सांगत 'आम्ही ना जिल्हा परिषद मेंबर, ना कॉर्पोरेशनला आमचं कोन्ही आहे, लोकप्रतिनिधींची जबाबदारी असते, आम्ही गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत जबाबदारी घ्यायला तयार असतोत. लोकांनी एका विश्वासाने आम्हाला निवडून दिलं आहे. त्यामुळे आम्ही सतरंजीही उचलायला तयार असतो आणि संसदेत सत्याचा झेंडा फडकावण्याची ताकदही आम्ही ठेवतो', अशा शब्दात खासदार सुळेंनी (Supriya Sule) मोदी सरकारला थेट इशारा दिला.
(Edited by- Ganesh Thombare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.