Shivajirao Patil
Shivajirao PatilSarkarnama

Shivajirao Patil News : लोकसभेच्या आजोबा उमेदवाराला पाच वर्षीय बालकाने दिल्या हटके शुभेच्छा !

Shirur Lok Sabha Constituency : शिरुरमधील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना शहीद जवानाच्या पाच वर्षीय मुलाने दिल्या शुभेच्छा..

Pimpri News : शिरुर लोकसभेची यावेळची निवडणूक आघाडी आणि महायुतीने अत्यंत प्रतिष्ठेची केल्याने तेथील प्रचार पहिल्याच टप्यात शिगेला पोहचला आहे. त्यांचे आजी,माजी खासदार असलेले दोन्ही उमेदवार दररोज एकमेकांवर तुटून पडत आहेत. असा आरोपांची धुळवड उडवून दिलेला प्रचार सोमवारी (22 एप्रिल ),मात्र एका क्षणी मोठा भावनिक झाला.

महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव-पाटील त्यांचाच तालुका असलेल्या आंबेगावच्या गावभेट दौऱ्यावर होते.त्यावेळी लौकी गावात त्यांना सुधीर पंढरीनाथ थोरात या शहीद जवानाच्या पाच वर्षाच्या मुलाने दिलेल्या अभिनव शुभेच्छा पाहून उमेदवारच नव्हे तर उपस्थितही गहिवरले.शुभेच्छा पत्रासोबत या बालकाने आजोबा म्हणणाऱ्या आढळरावांना चॉकलेट सुद्धा दिले.आढळराव हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) निवडणूक लढवित आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Shivajirao Patil
Kolhe Vs Aadhalrao News : केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता, आढळरावांनी आपला पराभव मान्य केलाय, कोल्हेंचे प्रत्युत्तर !

यश सुधीर थोरात असे या बालकाचे नाव असून तो `केजी`त आहे. त्याचे लष्करात असलेले वडील सुधीर पंढरीनाथ थोरात हे गेल्यावर्षी शहीद झाले.त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी त्यांच्या लौकी या गावी आढळरावांनी यशला शिक्षणासाठी दत्तक घेतल्याचे जाहीर केले.त्याच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी घेतली.त्याला आपल्या लांडेवाडी,मंचर येथील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये प्रवेश दिला.त्यामुळे त्यांना यश आजोबा म्हणू लागला.

आढळरावांचा आज थोरातांच्या लौकीत शिरूर (Shirur) लोकसभा निवडणूक प्रचारानिमित्त गावभेट दौरा होता. हे यशला समजताच त्याने आपल्या या आजोबांना भेटण्याचा हट्ट आपली आई तथा वीरपत्नी अश्विनी थोरात यांच्याकडे धरला.एवढेच नाही,तर त्याने आपल्या हाताने आढळरावांसाठी (Shivajirao Adhalrao Patil) शुभेच्छापत्र तयार केले.देशासाठी पप्पांनी वीरमरण पत्करल्यानंतर कुटुंबप्रमुख म्हणून सोबत राहिल्याबद्दल यशने या ग्रिटींग्जमध्ये स्वताच्या अक्षरात आपल्या या आजोबांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.अशीच जनतेची सेवा करण्याची संधी तुम्हाला पु्न्हा मिळो,अशा शुभेच्छा त्याने त्यात पुढे दिल्या.हे पत्र चॉकलेटसह त्याने आढळरावांना देताच ते गहिवरले.त्यांच्या डोळ्यात पाणी तरळले.

Shivajirao Patil
Srirang Barne Wealth : 'मावळ'मधील महायुतीचे दहावी पास उमेदवार बारणे अब्जाधीश!

या ह्रद्य भेटीच्या वेळी यशची आजी आणि वीर माता कौसल्या पंढरीनाथ थोरात सुद्धा त्याच्या सोबत होती.त्यांनी आपला मुलगा सुधीर हुतात्मा झाल्यानंतर आढळराव हे भावासारखे आमच्या कटुंबाच्या मागे उभे राहिले.ते कधी विसरणार नाही, अशी भावना यावेळी व्यक्त केली. माझ्या जनतेचे हेच प्रेम आणि आशीर्वाद मला नेहमी लढण्याची ऊर्जा देत राहतो,अशी प्रतिक्रिया या भावनिक प्रचार भेटीवर आढळरावांनी दिली.

(Edited by : Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com