Loksabha Election 2024 : महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी सोमवारी (ता.22) मावळमधून उमेदवारी अर्ज भरला. त्यासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार दहावी पास बारणे अब्जाधीश आहेत. तसेच गेल्या पाच वर्षांत त्यांच्या संपत्तीत 30 कोटी रुपयांनी वाढ झाली आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळीच बारणे दाम्पत्य अब्जपती होते. दोघांची मिळून एक अब्ज दोन कोटी 33 लाख 10 हजार 134 रुपयांची मालमत्ता होती. 2024 मध्ये ती एक अब्ज 31 कोटी 85 लाख 91 हजार 606 झाली आहे. म्हणजे गेल्या पाच वर्षांत ती 30 कोटींनी वाढली आहे. एकट्या बारणेंची(Srirang Barne) एक अब्ज सहा कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यांच्याकडे 26 लाखांची, तर पत्नी सरिता यांच्याकडे 12 लाखांची रोकड आहे. बारणेंकडे परदेशी बनावटीचे एक रिव्हॉल्वर आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
साठवर्षीय बाऱणे यांच्याकडे जमीनजुमला अशी स्थावर संपत्तीच अधिक आहे. त्यांच्याकडे साडेपंधरा कोटींची, तर पत्नीकडे एक कोटी 18 लाखांची जंगम मालमत्ता आहे. त्यात बारणेंची हिरेजडीत अंगठीच साडेअकरा लाखांची आहे. त्यांच्याकडे अर्धा किलो, तर पत्नीकडे पाऊण किलो सोने आहे. मर्सिडीज बेंजसह तीन आलिशान मोटारी हेत. 85 लाख रुपयांचे कर्ज बारणेंवर आहे.
2019ला बाऱणे दहावी नापास होते. त्यानंतर मार्च 2022ला ते दहावी पास झाले. त्यांच्याविरुद्ध दोन खटले प्रलंबित असून, एक गुन्हा दाखल आहे. 2009ची आमदारकी आणि 2019च्या खासदारकीच्या निवडणुकीत चुकीची माहिती दिल्याबद्दल 2021मध्ये त्यांच्याविरुद्ध दाखल झालेला खटला वडगाव मावळ (ता. मावळ,जि. पुणे) कोर्टात तपासावर आहे.
जमावबंदी आदेश धुडकावून बंद बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू करण्यासाठी तळेगाव चौक, चाकण येथे 2017 मध्ये केलेल्या रास्ता रोको आणि दंगलीचा दुसरा खटला खेड न्यायालयात प्रलंबित आहे. ऊर्से टोल नाक्यावर वाहने अडविल्याबद्दल 2012मध्ये वडगाव मावळ पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्याचा अद्याप तपास सुरूच आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.