Dilip Walse Patil : शिवाजीराव आढळरावांचा शिरूरमध्ये पराभव ; दिलीप वळसे पाटलांच्या अश्रूंचा बांधच फुटला

Shirur Lok Sabha Election 2024 : आजापपणामुळे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचाराता सहभागी होता न आल्याची खंत वळसे पाटील यांनी भरसभेत बोलून दाखविली. मंचर येथील सहविचार सभेत शिरूरची लढत आणि आढळराव पाटील यांच्या आठवणी सांगताना वळसे पाटलांना अश्रू अनावर झाले
Dilip Walse Patil
Dilip Walse PatilSarkarnama

Manchar News : लोकसभेच्या निवडणुकीत आजारपणामुळे सहभागी होता न आल्याचे दु:ख व्यक्त करताना राज्याचे सहकारमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते दिलीप वळसे पाटील भावनाविवश झाले. तब्बेत चांगली नसल्याने निवडणुकीच्या प्रचारात हजर राहू शकलो नाही, असं सांगतानाच वळसे पाटील यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. भर सभेत घडलेल्या या प्रकारामुळे कार्यकर्त्यांमध्ये काही काळ शांतता निर्माण झाली.

शिरूर लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या वतीने निवडणूक लढविणारे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना पराभव स्विकारावा लागला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी हा पराभव केला. या निवडणुक महायुतीचे उमेदवार आढळराव पाटील यांचा प्रचार करण्याची खूप इच्छा होती. मात्र आजापपणामुळे प्रचाराता सहभागी होता न आल्याची खंत वळसे पाटील यांनी भरसभेत बोलून दाखविली. मंचर येथील सहविचार सभेत शिरूरची लढत आणि आढळराव पाटील यांच्या आठवणी सांगताना वळसे पाटलांना अश्रू अनावर झाले.

या सभेत आढळराव पाटील यांनी पक्षाला मदत केल्याबद्दल वळसे पाटलांनी त्यांचे आभार मानले. ते म्हणाले की, दुर्दैवाने मी आजारी असल्याने प्रचारात येऊ शकलो नाही. रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन मंचरला आलो. निवडणूक होईपर्यंत इथेच थांबायचे ठरविले परंतू पुढे आणखी त्रास वाढल्याने मला मुंबईतील रुग्णालयात जावे लागले. या निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करता आला नाही, याची सल कायम मनात राहिल, असेही वळसे पाटील म्हणाले.

Dilip Walse Patil
Aadhalrao Patil : पराभवानंतर आढळरावांची आगपाखड! म्हणाले, 'बिनकामाचा माणुस निवडून दिला ही लोकशाहीची चेष्टा'

ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांचे विश्वासू अशी ओळख दिलीप वळसे पाटील यांची होती. गेल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर वळसे पाटील यांनी शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार यांच्या पाठीमागे उभे राहणे पसंत केले. त्यांच्या या निर्णयामुळे त्यांच्यावर जोरदार टीका देखील झाली होती. शिरुर लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात शरद पवार यांनी दिलीप वळसे पाटील यांच्या विधानसभा मतदारसंघात जाहीर सभा घेत वळसे पाटलांवर टीका केल्याचे दिसून आले होते. शरद पवारांनी आक्रमकपणे टीका करत या भागातून देवदत्त निकम यांना बळ देण्याची भूमिका घेतली. त्यामुळेच लोकसभेच्या निवडणुकीत आंबेगाव तालुक्यातून महायुतीचे उमेदवार अमोल कोल्हे यांना अकरा हजारांचे मताधिक्य मिळाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com