Shirur Lok Sabha Election : '...तर मी आणखी 4 लोकसभा निवडणुका लढणार'; आढळरावांनी असं का म्हटलं?

Lok Sabha Election 2024 : मी निवडणूक लढवायची की नाही हा माझा वैयक्तिक निर्णय आहे. मी राजकारणातून कधीच निवृत्त होऊ नये असं जर वाटत असेल तर...
Shirur Lok Sabha Election
Shirur Lok Sabha ElectionSarkarnama

Shirur News : शिरुर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकाचा प्रचाराला आता वेग आले आहे. युती-आघाडीच्या दोन्ही उमेदवारांची लगबग सुरु आहे. यातच आता शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आपली शेवटची निवडणूक असल्याचे सांगत भावनिक मुद्द्याला हात घातला तर तर अमोल कोल्हे यांनी या विधानावर टीकास्र सोडले होते. आता पुन्हा एकदा आढळराव पाटलांनी अमोल कोल्हेंवर पलटवार केला आहे. (Latest Marathi News)

अमोल कोल्हे माझ्या लोकसभा शेवटच्या निवडणुकीच्या वक्तव्याबाबत खूपच भावनिक झाले असतील आणि त्यांना वाटत असेल की, मी अजून चार लोकसभा निवडणुका लढवाव्या तर मी लोकसभा निवडणुका लढण्यास तयार आहे. अशा शब्दात शिरूर लोकसभा क्षेत्रातील महायुतीचे उमेदवार शिवाजी आढाळराव पाटील यांनी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Shirur Lok Sabha Election
Shirur Lok Sabha Constituency : शिरुर मतदारसंघातील 'या' उमेदवाराचं नाराज मतदारांनी हटके बॅनर लावून केलं स्वागत!

"ही माझही शेवटची लोकसभा (Lok Sabha) निवडणुक आहे, असं आवाहन शिवाजी आढळराव पाटील यांनी मतदारांना केलं होतं. मी निवडणूक लढवायची की नाही हा माझा वैयक्तिक निर्णय आहे. मी राजकारणातून कधीच निवृत्त होऊ नये असं जर अमोल कोल्हे यांना वाटत असेल तर मी पुन्हा त्यांच्यासोबत लोकसभा निवडणूक लढण्यास तयार आहे, असे आढळराव म्हणाले.

Shirur Lok Sabha Election
Sunil Chavan Join BJP: धाराशिवमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; महाराष्ट्र काँग्रेसचे सचिव सुनील चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार
Shirur Lok Sabha Election
NCP News: दक्षिण महाराष्ट्रातून ‘घड्याळ’ गायब ; पुणे जिल्ह्यात दोनच ठिकाणी उमेदवार रिंगणात

"माझ्यात 'मी' पण भरला नसून , अमोल कोल्हे यांच्यातच मी पणा भरलेला आहे. त्याचबरोबर अमोल कोल्हे ते लिहून दिलेली स्क्रिप्ट वाचतात, असा आरोप देखील शिवाजी आढाळराव पाटील यांनी केला आहे. भोसरी विधानसभा क्षेत्राचे भाजप आमदार महेश लांडगे हे लवकरच माझ्या प्रचारात सक्रिय होतील," असा विश्वास देखील शिवाजी आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांनी व्यक्त केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com