Supriya Sule News : कोणाला काय मिळालं? याचा हिशोब करा; खूप सोपं उत्तर आहे, सुप्रिया सुळेंनी अजितदादांना सुनावले !

Shirur Lok Sabha Constituency : प्रत्येकाचा एक काळ असतो. 80 वर्षाच्या पुढे गेल्यानंतर इतरांना संधी द्यायला पाहिजे. मी त्यांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली असती, पण मी त्यांचा..
Supriya Sule, Ajit Pawar
Supriya Sule, Ajit PawarSarkarnama

Pune News : बारामती लोकसभा मतदारसंघाचे मतदान पूर्ण झाल्याने पुणे जिल्ह्यातील उर्वरित तीन मतदारसंघात प्रचार करण्यासाठी आता महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांनी आपले लक्ष केंद्रीत केले आहे. बारामती मतदारसंघापाठोपाठ अटीतटीची निवडणूक असलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा, मेळावे, घेण्यास दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी सुरूवात केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे शिरूरच्या प्रचारात जोरदार सक्रिय झाल्याचे पहायला मिळत आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी गुरुवारी सभा झाली. या सभेत बोलताना 'मी शरद पवार यांचा मुलगा असतो, तर मला संधी मिळाली असती… पण केवळ मी त्यांचा मुलगा नाही, म्हणून मला संधी मिळाली नाही',असे विधान अजित पवार यांनी केले. अजितदादांनी केलेल्या विधानाचा समाचार घेत खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. आता मला त्यांचा स्वभाव माहीत आहे. तुम्हीच तुलना करा ना… कोणाला काय मिळालं? याचा हिशोब करा. मला काय मिळालं आणि अजितदादांना काय काय मिळालं.सगळंच तुमच्या समोर आहे. खूप सोपं उत्तर आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Supriya Sule, Ajit Pawar
Dr. Amol Kolhe On Shivajirao Aadhalrao Patil : मला महागद्दार म्हणाला होतात, तर तुम्ही केलेली गद्दारी कोणती ? कोल्हेंनी आढळरावांना डिवचले

आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेत बोलताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले होते की, शरद पवार आमचे दैवत आहे. त्याबद्दल दुमत नाही. प्रत्येकाचा एक काळ असतो. 80 वर्षाच्या पुढे गेल्यानंतर इतरांना संधी द्यायला पाहिजे. मी त्यांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली असती, पण मी त्यांचा मुलगा नाही, म्हणून मला संधी नाही, हा कसला न्याय? दिवसरात्र आम्ही काम केले. सर्व जिल्हा सांभाळला. शरद पवारांकडे जिल्हा बँक नव्हती. मी राजकारणात आल्यापासून ही बँक राष्ट्रवादीच्या ताब्यात ठेवली आहे. यांचा प्रत्येक शब्द पाळला, असे अजित पवार म्हणाले होते.

चंद्रकांत पाटील यांनी बारामतीमध्ये (Baramati) येऊन केलेल्या वक्तव्याबाबत सुप्रिया सुळे यांना विचारले असता, त्या म्हणाल्या, हे विधान दीड महिन्यापूर्वी केले होते. ते विधान आम्हाला वेदना देणार होते. शरद पवारांना संपवायचं आहे, असे शब्द चंद्रकांत पाटील यांचे होते. ते असं का बोलले, हे आम्हाला समजलं नव्हतं. मात्र गेले महिनाभर यावर कोणी बोललं नाही. लोकशाहीत असं चालत नाही.शरद पवारांना संपवायची ही प्रवृत्ती धक्कादायक होती, असेही सुळे म्हणाल्या. आमचा पक्ष फुटला, चोरला अशी चर्चा सुरू आहे. पण मी आजपण तेच म्हणते, 'प्यार से मांगा होता ना सबकुछ दे देते'. नाती तोडायला नाही तर नाती जोडायला ताकद लागते. मंत्री पद महत्वाचं की निष्ठा महत्वाची? हे तुम्हीच सांगा, असा प्रश्नही खासदार सुळे यांनी विचारला आहे.

Supriya Sule, Ajit Pawar
Ajit Pawar News : चंद्रकांतदादांनी बारामतीत येऊ नये, असे अजितदादांनी ठणकावून सांगितले!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com