Ajit Pawar News : चंद्रकांतदादांनी बारामतीत येऊ नये, असे अजितदादांनी ठणकावून सांगितले!

Lok Sabha Election 2024 : बारामतीत शरद पवार साहेब उभेच नव्हते, तर त्यांचा पराभवाचा प्रश्न येतोच कुठे? मात्र त्यांनी असं विधान केलं, हे चूक आहे. हे मी मान्य करतो. त्यांनी असं बोलायला नको होतं."
Ajit Pawar News
Ajit Pawar News Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : भारतीय जनता पार्टीचे नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बारामती मध्ये जाऊन शरद पवारांचा हिशोब चुकता करणार, त्यांचा पराभव घडवणार, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच नाराज झाले होत आणि चंद्रकांतदादांना बारामतीत येऊ नका, असे अजितदादांना त्यांना सांगितले होते, असा खुलासा झाला आहे. यामुळे आता चर्चांना उधाण आले आहे. (Latest Marathi News)

शिरुरमधील एका पत्रकार परिषदेत अजित पवार म्हणाले, "चंद्रकांत पाटलांनी केलेल्या विधानाला काही अर्थ नव्हता. यानंतर आम्ही चंद्रकांत पाटलांना म्हणालो, दादा तुम्ही आपलं पुण्यातच बघा. बारामतीत येऊ नका. बारामतीत काय असेल ते आमचे कार्यकर्ते बघतील. यानंतर चंद्रकांतदादा बारामतीत आले नाहीत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विधान करायला नको होतं -

चंद्रकांतदादांनी तसं विधान करायला नको होतं. पण ते पवारांबद्दल असं का बोलून गेले? आम्हाला याची माहिती नाही. एकदा आम्ही सांगितल्यावर पुन्हा त्यांनी अवाक्षर देखील काढलं नाही. विशेष म्हणजे बारामतीत शरद पवार साहेब उभेच नव्हते, तर त्यांचा पराभवाचा प्रश्न येतोच कुठे? मात्र त्यांनी असं विधान केलं, हे चूक आहे. हे मी मान्य करतो. त्यांनी असं बोलायला नको होतं."

Ajit Pawar News
Code of Conduct Violations News : बारामती लोकसभा मतदारसंघात आचारसंहिता भंगाच्या तक्रारींचा पाऊस !
Ajit Pawar News
Ajit Pawar NCP : बारामतीत 'घड्याळा'च्या प्रचारासाठी आणलं अन् उन्हातान्हात उपाशी ठेवलं

चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते?

17 मार्चला बारामतीत महायुतीची बैठक झाली होती. या बैठकीनंतर चंद्रकांत पाटील यांनी थेट शरद पवार यांच्या बालेकिल्ल्यात जात आव्हान दिलं होतं. "राजकारणात तराजू लावायचे असतो, शरद पवारांचा पराभव हा आम्हाला जास्त वजनदार वाटतो. महाराष्ट्रात 2019 मध्ये शरद पवारांनी शिवसेनेला बाहेर काढून राज्याला फसविले. नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचीही त्यांनी फसवणूक केली, आता आम्हाला शरद पवार यांचा हिशेब चुकता करण्याची संधी मिळाली आहे, मला व माझ्या कार्यकर्त्यांना शरद पवार यांचा पराभव करायचा इतना काफी है...बाकी गोष्टी आमच्यासाठी कमी महत्वाच्या आहेत," असं विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com