Shivajirao Adhalrao Patil: दिलीप मोहितेंनी सांगितलेली 'ट्रिक' आढळरावांना विजयी करेल का?

Shirur Loksabha Election 2024: जनतेच्या, शेतकऱ्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी आता ही अखेरची निवडणूक असेल. सहकार्य करा, असे आढळराव यांनी सांगितले. विजयी करण्याचे आवाहनही त्यांनी खेड तालुक्यातील मतदारांना केले आहे.
Shivajirao Adhalrao Patil
Shivajirao Adhalrao PatilSarkarnama
Published on
Updated on

Loksabha Election 2024 : "खेड तालुक्यातील जनतेने मला पहिल्यांदा, दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा खासदार केले. याचं श्रेय फक्त खेड तालुक्याला आहे, ही माझी शेवटची निवडणूक आहे," अशी भावनिक साद शिरूर लोकसभा मतदारसंघातील (Shirur Loksabha Election 2024) महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांनी घातली.

आढळराव पाटलांच्या उमेदवारीला सुरुवातीला विरोध करणारे खेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील (MLA Dilip Mohite Patil) सध्या आढळरावांच्या प्रचारार्थ मैदानात उतरले आहेत, त्यांनी आढळरावांना आपल्या विजयाचे गुपित सांगितले. ही 'ट्रिक' आढळरावांनी आपल्या भाषणात वापरून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे.

गेल्या वीस वर्षांत पदावर असताना आणि नसताना मी जनतेची सेवा केली. सुख दुःखात सहभाग घेतला. महामार्गाची कामे मार्गी लावली. गावागावांत विकासाची कामे केली. पाच वर्षे मतदारसंघ मागे राहिला.

जनतेच्या, शेतकऱ्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी आता ही अखेरची निवडणूक असेल. सहकार्य करा, असे आढळराव यांनी सांगितले. विजयी करण्याचे आवाहनही त्यांनी खेड तालुक्यातील मतदारांना केले आहे.

2019च्या विधानसभा निवडणुकीत दिलीप मोहिते हे आढळरावांच्या विरोधात होते. ते विजयी झाले. त्यावेळी मोहितेंनी भाषणात ही माझी शेवटची निवडणूक असल्याची साद मतदारांना घातली होती. हीच 'ट्रिक' आढळरावांनी वापरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Shivajirao Adhalrao Patil
Cricketers in Politics: चौकार-षटकार मारले, पण राजकीय खेळपट्टीवर झाले क्लीन बोल्ड...

शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा निर्मला पानसरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील, बाजार समितीचे सभापती कैलास लिंभोरे, दूध संघाचे संचालक अरुण चांभारे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष भगवान पोखरकर, भाजपचे तालुकाध्यक्ष शांताराम भोसले उपस्थित होते.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com