Shiv Sangram News: 'शिवसंग्राम' महायुतीतून बाहेर पडण्याच्या मार्गावर?

Maharashtra Politics: 'शिवसंग्राम'नेही मेळाव्यातून काढता पाय घेतला आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
Shiv Sangram News
Shiv Sangram NewsSarkarnama
Published on
Updated on

Pune News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून महायुती आपल्या मित्रपक्षांमध्ये समन्वय यावा, यासाठी एकत्रित मिळावे घेत आहे. मात्र या मेळाव्यांमध्ये देखील मित्र पक्षांमध्ये समन्वयाचा अभाव दिसून येत आहे. छोट्या छोट्या कारणावरून महायुतीच्या पक्षांमध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे. अशातच आता महायुतीतील घटक पक्ष असणारा शिवसंग्राम हा पक्ष वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे.

शिवसंग्राम पक्षाकडून आज (मंगळवार) पुण्यामध्ये राज्यस्तरीय मेळाव्याच्या आयोजन करण्यात आले आहे. या आयोजनाच्या माध्यमातून शिवसंग्राम पुढची राजकीय भूमिका जाहीर करू शकतो त्यामुळे शिवसंग्राम आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीत राहणार का नाही याचा निर्णय आजच्या बैठकीत होऊ शकतो असं बोललं जात आहे.

पुण्यात शासकीय विश्रामगृह नुकतीच राज्यव्यापी बैठक झाली. त्यानंतर आज राज्यस्तरीय बैठक होत आहे. राज्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. विनायक मेटे यांच्या संकल्पनेतून रायगडावर शिवसंग्राम या संघटनेची स्थापना केली गेली. मागील काही दिवसात मोठ्या दिमाखात एकविसावा वर्धापनदिन साजरा केला गेला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी विविध जाती धर्माचे मावळे बरोबर घेऊन स्वराज्याची स्थापना केली व रयतेसाठी स्वराज्य उभे केले यांची प्रेरणा घेऊन विनायक मेटे यांनी रायगडावर सर्व जाती धर्मातील मावळ्यांना एकत्रित घेवून शिवसंग्रामची स्थापना केली व आज शिवसंग्राम संघटना महाराष्ट्रामध्ये नावारूपाला आलेली आहे.

आगामी काळातील निवडणुका , मोर्चे बांधणी, पक्ष , संघटना बांधणी या अनुषंगाने ही बैठक महत्वाची मानली जात आहे. आयोजित बैठकीत चिंतन शिबिर तथा पदाधिकारी मार्गदर्शन शिबिराचे देखील आयोजन केले आहे. शिबिर शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. शिवसंग्रामच्या सर्व जिल्हा पदाधिकारी,जिल्हा व तालुका कार्यकारणी सदस्यांसह, कार्यकर्ते यांनी या शिबिरास पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, घोले रोड, पुणे येथे दि. उपस्थित रहावे, असे आवाहन तानाजी शिंदे यांनी केले आहे.

महायुतीचा मित्रपक्ष असणाऱ्या रिपाइं पक्षाने काल (सोमवारी) कल्याण डोबिंवली येथे झालेल्या महायुतीच्या मेळाव्याकडे पाठ फिरवली आहे. त्यानंतर आता 'शिवसंग्राम'नेही मेळाव्यातून काढता पाय घेतला आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Shiv Sangram News
Maval News: मावळ लोकसभेवर पुन्हा ठाकरे गटाचाच खासदार होणार; संजोग वाघेरेंच्या उमेदवारीबाबत...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com