आधी भाजपनं अन् आता मित्रपक्षचं आमची ठोकतोय! शिवसेना खासदाराचं थेट मुख्यमंत्र्यांकडं बोट

उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असूनही पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताकद मिळत नसल्याची खंत परभणीचे खासदार संजय जाधव यांनी पुन्हा एकदा बोलून दाखवली.
Shiv Sena MP Sanjay Jadhav, CM Uddhav Thackeray Latest Marathi News
Shiv Sena MP Sanjay Jadhav, CM Uddhav Thackeray Latest Marathi News Sarkarnama
Published on
Updated on

पुणे : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे मुख्यमंत्री असूनही पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताकद मिळत नसल्याची खंत परभणीचे खासदार संजय जाधव यांनी पुन्हा एकदा बोलून दाखवली. तसेच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवरही निशाणा साधला आहे. आधी भाजपने आमची ठोकली आणि आता आमचा मित्रपक्षचं आमची ठोकतोय, अशा शेलक्या शब्दांत त्यांनी राष्ट्रवादीवर टीका केली. (Shiv Sena MP Sanjay Jadhav Latest Marathi News)

पुण्यात 25 ते 29 मे या कालावधीत शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान राबविले जात आहे. या अभियानाची पुण्यातील जबाबदारी जाधव यांच्यावर आहे. पुण्यातील विकासकामे, समस्या, पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेत तसा अहवाल ते पक्षाकडे सादर करणार आहे. तत्पुर्वी त्यांनी शुक्रवारी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री ठाकरेंसह राष्ट्रवादीवर नाराजी व्यक्त केली. (MP Sanjay Jadhav criticizes NCP)

Shiv Sena MP Sanjay Jadhav, CM Uddhav Thackeray Latest Marathi News
संभाजीराजेंच्या पक्षात जाणार का? शिवेंद्रराजेंनी स्पष्ट शब्दांत सांगितलं...

संजय जाधव म्हणाले, शिवसेनेचा मुख्यमंत्री असून पाठबळ मिळत नसल्याची येथील पदाधिकाऱ्यांची नाराजी आहे. पुणे जिल्ह्यात शिवसेनेचा एकही आमदार नाही. भाजपचे, राष्ट्रवादीचे आमदार आहेत. राष्ट्रवादीचे पालकमंत्री आहेत. आघाडीच्या निकषांप्रमाणे ज्या पक्षाचा आमदार त्यांना 60 टक्के आणि इतरांना 20-20 टक्के सत्तेचा शेअर मिळायला हवा. पण विकासकामांमध्ये हा शेअर मिळत नाही, अशी कार्यकर्त्यांची खंत आहे.

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना सर्व दिलं जातं, मात्र शिवसेनेला डावलण्यात येत असल्याचं पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्यापर्यंत हे पोहचवणार आहे. पालकमंत्री अजित पवार यांनी आघाडीच्या निकषांप्रमाणे आम्हाला आमचा शेअर द्यावा, अशी त्यांना विनंती असल्याचे संजय जाधव म्हणाले. कार्यकर्त्यांना अन्यायाची भावना असून वरिष्ठांनी आणकी लक्ष घालायला हवे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Shiv Sena MP Sanjay Jadhav, CM Uddhav Thackeray Latest Marathi News
मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द मोडला! संभाजीराजेंनी केला गौप्यस्फोट

दरम्यान, जाधव यांनी याआधीही राष्ट्रवादीवर उघडपणे टीका केली आहे. परभणीच्या जिल्हाधिकारीपदी आंचल गोयल यांच्या नियुक्तीवरून काही दिवसांपूर्वी जाधव म्हणाले होते की, गोयल जिल्हाधिकारी नको म्हणून मी फक्त मुख्यमंत्र्यांकडे शिफारस केली होती. मात्र, राष्ट्रवादीवाल्यांनी त्याबाबत प्रचंड रान पेटवलं. आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून, अशी त्यांची पद्धत आहे. मात्र, राष्ट्रवादीवाल्यांना आम्ही कधीही पायाखाली घालू शकतो. आम्ही आता सहनशीलतेच्या पुढे गेलो आहोत, असंही जाधव यांनी सुनावले होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com