Pandharpur Market Committee : प्रशांत परिचारकांनी रणशिंंग फुंकले : ‘आम्ही कशालाही कमी नाही; एकास एकलाही आमची तयारी’

गर्वाचं घर नेहमी खाली असतं, राजकारणात फार मस्तीनं बोलून चालत नाही. कोणी बोलत असेल तर आम्ही त्याला कमी नाही.
Prashant Paricharak
Prashant Paricharak Sarkarmnama

सोलापूर : पंढरपूर बाजार समितीची निवडणूक लागली तरी आपल्याला पक्ष म्हणून काम करायचं आहे. राजकारणात आपापल्या मर्यादा सांभाळून सर्वांनी काम केलं पाहिजे. गर्वाचं घर नेहमी खाली असतं, राजकारणात फार मस्तीनं बोलून चालत नाही. कोणी बोलत असेल तर आम्ही त्याला कमी नाही. असं कोणी समजू नये, आम्हाला गृहीत कोणी धरू नये. एकास एकही आपली तयारी आहे, अशा शब्दांत पंढरपूरचे माजी आमदार प्रशांत परिचारक (Prashant Paricharak) यांनी बाजार समितीच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले. (Prashant Paricharak held a supporter's meeting regarding the election of Pandharpur market committee)

पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पांडुरंग परिवाराची बैठक पंढरपुरात झाली. या वेळी माजी आमदार प्रशांत परिचारक, उमेश परिचारक, प्रणव परिचारक यांच्यासह बाजार समितीचे आजी-माजी अध्यक्ष, संचालक, विविध कार्यकरी सोसायटीचे अध्यक्ष, संचालक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Prashant Paricharak
Nitin Gadkari News : ‘नितीन गडकरींना एवढी मते द्याकी मोजणारेही पागल झाले पाहिजेत’

परिचारक म्हणाले की, माजी आमदार औदुंबरअण्णा पाटील, सुधाकरपंत परिचारक यांनी बाजार समिती वाढविण्याचे काम केले आहे. समितीच्या १५ जागांसाठी निवडणूक आहे. मागील निवडणुकीत आपण ग्रामपंचायत मतदारसंघातून चारही जागा निवडून आणल्या होत्या. गेल्या वेळीपेक्षा आता चांगली परिस्थिती आहे. कुणी कितीही वल्गना केल्या आणि आम्ही निवडणूक लढविण्याचे ठरविले तर आपण कुठेही कमी पडणार नाही. आपण निवडणूक शंभर टक्के जिंकू. पण आमची ताठर भूमिका नाही. कारण संस्था महत्वाची आहे, व्यक्ती महत्वाची नाही.

ज्यांच्या नावावर दहा गुंठे जमीन आहे, त्यांना बाजार समितीची निवडणूक लढविण्याची परवानगी नव्या कायद्याद्वारे मिळाली आहे. सूचक व्हा, म्हणून तुमच्याकडे अनेक जण येतील. तुम्ही सही केलेली आहे, ते फक्त आम्हाला सांगा. म्हणजे आम्ही कुठल्याही अर्जावर तुमची सही घेणार नाही. तुम्ही अगोदर कुणालातरी सूचक व्हाल आणि आमच्याही अर्जावर सही केली तर आमचा अर्ज बाद व्हायचा. कारण पाहुणेरावळे, नात्यागोत्यात सही केली जाते. त्यात कुठलंही राजकारण नसतं. पण फटका आपल्या उमेदवाराला बसू शकतो. एक तर तुम्ही आपल्या पार्टीच्या बाहेरील उमेदवाराला सही करू नका. केली तर संबंधित पाहुण्याच्या अर्जावर मी सही केली आहे, ते आम्हाला सांगा, असे आवाहनही परिचारक यांनी केले.

Prashant Paricharak
Thackeray Vs Shinde : उदय सामंतांचा गौप्यस्फोट : ठाकरे गटातील १३ आमदार आमच्या संपर्कात

प्रशांत परिचारक म्हणाले की, माजी आमदार सुधाकरपंत परिचारक आणि आमच्या कारकिर्दीतही सोसायट्यांच्या माध्यमातून कोणाचेही कर्ज आम्ही अडविले नाही. अगदी विरोधी पार्टीचा असला तरी आम्ही सर्वांचे कर्ज मंजूर केलेले आहे. त्यामुळे विरोधकही सोसायट्यांमध्ये आपल्यासोबत येतात. गेल्या वर्षभरात तालुक्यातील ८० ते ९० टक्के सोसायट्या ह्या बिनविरोध झाल्या आहेत.

मागील पाच ते सहा निवडणुकांत माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांनी बाजार समितीत अनेक कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी दिली. बाजार समितीची मागील निवडणूकही बिनविरोध केली होती. भालकेनाना आणि कल्याणराव काळे यांना तीन-चार जागा देऊन आपण बाजार समिती बिनविरोध केली हेाती. शेतकरीहिताचा विचार करून सर्वांना सोबत घेऊन ही संस्था आपण चालवतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Prashant Paricharak
Solapur News : पाणीप्रश्नावर सुभाष देशमुख आक्रमक....थेट देवेंद्र फडणवीसांना लावला फोन!

परिचारक कुटुंबातील व्यक्ती कधीही बाजार समितीचा चेअरमन झाला नाही

परिचारक म्हणाले की, सोलापूर जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या विचार करता तेथील आमदारच बाजार समितीचे चेअरमन आहेत. ते नाहीतर आमदारांच्या घरातील व्यक्ती अध्यक्ष असते. पण, पंढरपूर बाजार समितीचा चेअरमन कधीही आमच्या घरातील झालेला नाही. संचालक म्हणूनसुद्धा आम्ही कधी बाजार समितीवर येत नाही. फक्त पणन मतदारसंघातून उमेश परिचारक यांच्या नावाचा ठराव व्हायचा, त्यामुळे ते बाजार समितीत असायचे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com