Pune Loksabha Election 2024 : मोहोळ, मुळीक, मानकर...पुणे लोकसभेसाठी '3 M' इच्छुक!

Shivaji Mankar and Pune Loksabha Election : पुण्याचे अनेक प्रश्‍न प्रलंबित आहेत. त्यांची सोडवणूक होणे आवश्‍यक आहे,' असंही मानकर यांनी म्हटले आहे.
Mohol, Mulik, Mankar
Mohol, Mulik, MankarSarkarnama
Published on
Updated on

Pune BJP News : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. निवडणुकीची प्रत्यक्ष तारीख केवळ जाहीर होणे बाकी आहे, परंतु तारीख जाहीर होण्याची वाट न पाहताच सर्वच राजकीय पक्षांकडून मतदारसंघामध्ये जोरदार तयारी सुरू आहे, तर इच्छुक उमेदवारांकडूनही मोर्चेबांधणी केली जात आहे.

याचा प्रत्यय महाराष्ट्रातील जवळपास सर्वच मतदारसंघांत येत आहे. पुण्यातही भाजपकडून उमेदवारी मिळवण्यासाठी चांगलीच स्पर्धा असल्याचे दिसून आले आहे. अगोदरच काही नावे चर्चेत असताना आता या स्पर्धेत आणखी एक नाव जुडलं गेलं आहे आणि हे नाव म्हणजे शिवाजी मानकर आहे.

शिवाजी मानकर(Shivaji Mankar) यांनीही पुणे लोकसभा निवडणूक भाजपकडून लढवण्याची तयारी दर्शवल्याने आता मुळीक, मोहोळ, मानकर असे तीन M भाजपकडून लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे दिसत आहे. या अगोदर पुणे लोकसभा निवडणूक भाजपकडून लढवण्यासाठी माजी महापौर मुरलीधर मोहोळ(Muralidhar Mohol), माजी आमदार जगदीश मुळीक आणि भाजपचे राष्ट्रीय नेते सुनील देवधर यांचीही नावे शर्यतीत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Mohol, Mulik, Mankar
Loksabha Election 2024 : ...तर लोकशाही, संविधानाची ओळख पुसली जाईल; कोणी केली भीती व्यक्त?

'फ्रेंड्स ऑफ बीजेपी'(BJP) या संस्थेचे प्रमुख असणाऱ्या शिवाजी मानकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले की, 'कोरोना कालावधीत पुणे शहरातील नागरिकांसाठी मोठे काम केले. यापुढे विमानतळ, रेल्वे, मेट्रो, पर्यावरण अशा वेगवेगळ्या प्रकारचे शहराचे प्रश्‍न असून, ते सोडविण्याची गरज आहे. त्यासाठीच आपण लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असून, कामाच्या जोरावरच भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठांकडे तिकिटाची मागणी केली आहे.'

याशिवाय 'मी मूळचा पुण्याचा आहे, नाशिकमध्ये शेतीनिमित्त वास्तव्यास होतो. तेथे देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी दिलेल्या संधीमुळेच 2014 मध्ये भाजपच्या तिकिटावर मी छगन भुजबळ यांच्याविरुद्ध येवला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढलो होतो. पुण्याचे अनेक प्रश्‍न प्रलंबित आहेत. त्यांची सोडवणूक होणे आवश्‍यक आहे,' असंही मानकर यांनी या वेळी सांगितलं.

Mohol, Mulik, Mankar
Maval Loksabha Election 2024 : मावळ लोकसभेसाठी भाजपा गंभीर; कोअर कमिटीने फडणवीसांची भेटही घेतली!

'शहरात विकासाचे आदर्श मॉडेल आपण राबवू शकतो. आगामी काळात पुण्यासाठी चांगले प्रकल्प, उद्योग आणण्यासाठी, तसेच इथे असलेल्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी लोकसभेत जाण्याची संधी मिळणे आवश्‍यक आहे. त्यादृष्टीने पक्षाकडे लोकसभा निवडणूकीसाठी तिकीट देण्याची मागणी केली आहे,' असं मानकर म्हणाले.

Mohol, Mulik, Mankar
Pune LokSabha Election : मोहोळ, मुळीक, यांच्यानंतर आता शिवाजी मानकरांनीही लोकसभेसाठी ठोकला शड्डू

याशिवाय पुणे शहराच्या विकासाशी संबंधी विविध मुद्द्यांबाबत मानकर म्हणाले, 'शहरात वाहतुकीची समस्या, मेट्रोचा विस्तार, सुरळीत पाणीपुरवठा, पार्किंग व्यवस्था, सीएसआर निधीतून शाळांचे सक्षमीकरण, कौशल्य विकास अशा अनेक क्षेत्रात लोकसहभागातून काम करावे लागणार आहे.'

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com