Shivajirao Adhalarao Patil : लोकसभेतील पराभवानंतर आढळराव पाटील म्हणतात, 'मीच किंगमेकर'; विधानसभेबाबत मोठं विधान

Shivajirao Adhalarao Patil stance on assembly elections : शिरूर विधानसभा मतदारसंघातील विकासकामांची पाहणी करताना शिवाजीराव आढळराव पाटील यांनी विधानसभा निवडणुकीबाबत मोठं विधान केले. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Shivajirao Adhalarao Patil
Shivajirao Adhalarao Patil Sarkarnama

Shivajirao Adhalarao Patil News : शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत मोठं विधान केलं आहे.

शिरूरमधील विकास कामांची पाहणी करत असताना, मी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक नाही. मात्र विकास निधी आणण्यासाठी आणि विकास कामे खेचून आणण्यासाठी 'किंगमेकर'च्या भूमिकेत राहणार आहे. तसेच मी महायुतीचा प्रचार करत राहू, असे शिवाजीराव आढळराव पाटील यांनी स्पष्ट सांगितले.

लोकसभा निवडणुकीत शिरूर मतदारसंघात शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार गट आमने-सामने होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अमोल कोल्हे यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला. शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून कडवी झुंज दिली.

अमोल कोल्हे या निवडणुकीत 1 लाख 40 हजार 951 मतांनी विजयी झाले. लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकांची लगबग सुरू झाली आहे. इच्छुकांकडून चाचपणी सुरू आहे. शिवाजीराव आढळराव पाटील शिरूरमध्ये विकास कामांची पाहणी करत असताना, ते विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्याच्या चर्चा सुरू झाल्या.

Shivajirao Adhalarao Patil
Ajit Pawar Letter : लोकसभेत सुनेत्रा वहिनींचा पराभव का झाला? अजितदादांना कार्यकर्त्यानं सांगितली गावागावातील कथा

शिवाजीराव आढळराव पाटील यांनी त्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. "मी विधानसभेसाठी इच्छुक नाही. लोकसभा निवडणुकीला (Lok Sabha Election) जनतेने दिलेला कौल्य मान्य आहे. परंतु लोकांची कामे करण्यासाठी मी कार्यरत राहणार आहे. महायुतीच्या उमेदवारांसाठी मतदारसंघात फिरत राहणार आहे. दर रविवारी होत असलेला जनता दरबार कायम सुरू राहील. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात विकास निधी आणत राहू. शिरूरमध्ये म्हाडाची योजना राबवण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे", असे शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले.

Shivajirao Adhalarao Patil
Sharad Pawar : "लोकसभा निकालानं सर्वांना जमिनीवर आणलं", राज ठाकरेंचं विधान अन् शरद पवारांनी मोजक्याच शब्दांत दिलं उत्तर...

लोकसभा निवडणुकीला कांद्यामुळे सत्ताधाऱ्यांची अडचण झाली. आता कांद्याबरोबर दूध दरवाढी प्रश्न समोर आला आहे. कांदा आणि दुधाला चांगला भाव मिळाला पाहिजे. कांदा आणि दुधाच्या किंमतीसंदर्भात कायमस्वरूपी धोरण होणे गरजेचे आहे. याकरिता कोणी प्रयत्न करो अगर न करो, मी मात्र सतत पाठपुरावा करत राहणार आहे. तसेच पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प आणि पुणे-नगर महामार्ग मार्गी लावण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करत राहणार असल्याचे शिवाजीराव आढळराव पाटील यांनी स्पष्ट केले. शिवाजीरावांची ही भूमिका म्हणजे, लोकप्रतिनिधी नसलो म्हणून काय झाले, सत्तेजवळ राहून 'किंगमेकर' राहण्यासारखी आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com