Ajit Pawar Letter : लोकसभेत सुनेत्रा वहिनींचा पराभव का झाला? अजितदादांना कार्यकर्त्यानं सांगितली गावागावातील कथा

Baramati Politics : आपल्या भोवती गावागावातील पुढारी फिरतात. ते सामान्य लोकांना, कार्यकर्त्यांना आपल्यापर्यंत पोचू देत नाहीत.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama

Baramati Political News : बारामती लोकसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा दीड लाख मतांच्या फरकाने पराभव झाला. याला कारणीभूत कायम अजितदादांच्या भोवती फिरणारे नेतेमंडळीच असल्याचे बोलले जात होते.

आता त्याच अनुषंगाने एका सामान्य कार्यकर्त्याने अजित पवारांना उद्देशून एक पत्र लिहिले आहे. त्यात गावागावांतील पुढारी लोकांना कसे त्रास देतात, त्याचा फटका निवडणुकीत कसा झाला, याकडे लक्ष वेधून या पुढाऱ्यांचा बंदोबस्त करण्याचा आग्रहच कार्यकर्त्याने अजितदादांकडे धरला आहे.

बारामतीतील किरण लकडे या कार्यकर्त्याने अजितदादांना लिहिलेले पत्र आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. किरण यांनी विकासासाठी अजित पवार भाजपसोबत गेले, त्यांना उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री पदे मिळाल्याचा आनंद आहे, असे म्हटले. लोकसभेत मात्र भावनेच्या पुढे विकासकामांनी तग धरला नाही, असे म्हणत पराभवाचे मूळ कारण शोधण्याचेही आवाहन केले आहे.

आपल्या भोवती गावागावातील पुढारी फिरतात. ते सामान्य लोकांना, कार्यकर्त्यांना आपल्यापर्यंत पोचू देत नाहीत. तुम्ही ज्यांना स्थानिक स्वाराज्य संस्थांवर वर्णी लावली, दुसऱ्या फळीतील पदे दिलीत त्यांनी लोकांशी संपर्क तोडला आहे. तसेच तुम्ही दिलेल्या पदांचा वापर ते लोकांसाठी नाही तर आपलीच घरे भरण्यासाठी करत आहेत, अशी तक्रारच लकडे यांनी पत्राद्वारे केली.

Ajit Pawar
BJP MLC Election Candidate List : मोठी बातमी! विधान परिषदेसाठीची भाजपच्या संभाव्य उमेदवारांची 'ती' यादी 'फेक' ? धक्कादायक माहिती समोर

लोक त्यांच्याकडे कामे घेऊन गेली तर ते टोलवा टोलवी करतात. वेळप्रसंगी धमकीही देतात. तीच कामे तुमच्याकडे घेऊन आलो की आडवे येतात. अनेकदा या गावपुढाऱ्यांनीच सहयोगवरून हाकलून दिले आहे, असेही किरण यांनी सांगितले. तसेच त्यांचे ऐकले नाही तर गावात राहायचे असते, अशी भीतीही व्यक्त केली. त्याचाच परिणाम लोकसभेत दिसल्याचेही त्यांनी पत्राद्वारे स्पष्ट केले आहे. आता विधानसभेत या गोष्टी टाळाव्यात, याकडेही लकडेंनी लक्ष वेधले.

(Edited by Sunil Dhumal)

Ajit Pawar
Pune RTO : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! पालखी सोहळ्यानिमित्त शहरातील वाहतुकीत बदल; 'हे' मार्ग बंद

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com