आढळरावांनी मोहितेंवर बाजी उलटवली; मुख्यमंत्र्यांकडून पोखकरांचा सत्कार करत इमारतीचा प्रश्न लावला मार्गी

या निर्णयानुसार पंचायत समितीच्या मूळ बांधकाम आदेशाप्रमाणे ही इमारत मंजूर जागेवरच केली जाईल, असा आदेश मुख्यमंत्र्यांंनी दिला.
shivajirao Adhalrao Patil-Bhagwan Pokharkar-Eknath Shinde
shivajirao Adhalrao Patil-Bhagwan Pokharkar-Eknath ShindeSarkarnama

शिक्रापूर (जि. पुणे) : शिवसेनेचे (shivsena) खेडचे (Khed) तत्कालीन सभापती भगवान पोखरकर यांना वर्षभरापूर्वी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री असताना राजकीय कुरघोडीतून अटक झाली होती. ती सल न विसरलेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव (Shivajirao Adhalrao Patil) यांनी मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) येताच अटकेच्या वेदनेची सव्याज परतफेड करत पोखरकरांचा जाहीर सत्कार करवून घेतला. शिवाय, बोनस म्हणून ज्या पंचायत समितीच्या इमारतीला खेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते (Dilip Mohite) यांचा विरोध होता, ती इमारत मूळ आखाड्याप्रमाणे मूळ जागेवरच तात्काळ बांधण्याचा निर्णयही मुख्यमंत्र्यांकडून करवून घेतला. त्यामुळे आढळरावांनी खेडचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते यांच्यावर पुन्हा बाजी उलटवत एकच दगडात अनेक पक्षी मारले आहेत. (Shivajirao Adhalrao cleared the issue of building of the khed panchayat samiti)

खेड पंचायत समितीचे शिवसेनेचे सभापती भगवान पोखरकर यांच्याविरोधात ११ सदस्यांनी अविश्वास ठराव आणला होता. त्यामध्ये शिवसेनेच्याही काही सदस्यांचा समावेश होता. तो ठराव मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर पोखरकर त्या निर्णयविरोधात न्यायालयात गेले. अविश्वास ठराव आणून सहलीवर गेलेल्या सदस्यांवर हल्ला केल्याचा आरोप करत सभापती पोखरकर यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणात पोखरकर यांना गोवण्यात आल्याचा दावा करण्यात येत होता. त्याच वेळी ठाकरेंकडून शिवसैनिकांना बळ मिळत नसल्याची चर्चाही जिल्हाभर होती. आढळराव यांनीही ती गोष्ट ‘मातोश्री’पर्यंत पोचवली होती. मात्र, आघाडी सरकार असल्याचे कारण देऊन त्यावेळी आढळराव यांची बोळवण केली होती. ती सल आढळराव यांना होती.

shivajirao Adhalrao Patil-Bhagwan Pokharkar-Eknath Shinde
शिवसेना फुटीमागचे ‘चाणक्य’ अमित शहांच्या मुलाला नार्वेकरांनी दिल्या शुभेच्छा!

खेड पंचायत समितीच्या इमारतीचेही राजकारण गेली दोन वर्षे रंगले होते. तत्कालीन आमदार सुरेश गोरे यांनी इमारतीसाठी चार कोटींचा निधी मंजूर करून आणला होता. कामाची वर्क ऑर्डर होऊन भूमिपूजनही झाले होते. मात्र, जिल्हा परिषद व राज्य सरकारमधील ताकद वापरुन या कामाची जागा बदलण्यापर्यंत हे प्रकरण गेले होते. या विरोधात शिवसेनेने महाआघाडीतील घटकपक्ष असताना थेट सत्ताधाऱ्यांच्या विरोधात पुणे जिल्हा परिषदेत आंदोलनही छेडले होते. याही प्रकरणात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बोटचेपी भूमिका आढळराव यांना खटकली होती.

shivajirao Adhalrao Patil-Bhagwan Pokharkar-Eknath Shinde
बड्या नेत्याच्या दबावामुळे कोतमिरे सोडणार ‘डीसीसी’चे प्रशासकपद? निर्णयानंतर कर्मचारी ओक्साबोक्शी रडले

त्यानंतर शिवसेनेत बंड करून एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. त्यानंतर आढळरावही शिंदे गटात सामील झाले. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानावर ही गोष्ट घालून दोन्ही निर्णय पूर्वीप्रमाणे करून घेतले. पोखरकर यांचा थेट मुख्यमंत्र्यांच्या दालनात व भरबैठकीत सत्कार करीत खेडच्या पंचायत समिती इमारतीचा निर्णयही करून घेतला. या निर्णयानुसार पंचायत समितीच्या मूळ बांधकाम आदेशाप्रमाणे ही इमारत मंजूर जागेवरच केली जाईल, असा आदेश मुख्यमंत्र्यांंनी दिला.

shivajirao Adhalrao Patil-Bhagwan Pokharkar-Eknath Shinde
आदित्य ठाकरेंच्या स्वागत बॅनरवर झळकले शिंदे समर्थक आणि गुन्हेगारांचे फोटो!

जुन्या राजकारणाला रंगत

माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील आणि खेडचे आमदार दिलीप मोहिते यांच्या राजकीय नाते संपूर्ण पुणे जिल्ह्याला परिचित आहे. दोघेही एकमेकांवर अक्षरशः तुटून पडतात. आता आढळराव यांच्या विचाराचे सरकार आणि उद्धव ठाकरेंचा दबाव नसल्याने माजी खासदारांनी हे दोन्ही निर्णय पूर्वीप्रमाणे करूवून घेतले आहेत. आंबेगावच्या पाटलांनी खेडच्या मोहितेंवर डाव उलटवत जुन्या राजकारणाला पुन्हा एकदा रंगत आणली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com