शिवाजीराव भोसले बँक : अडीच हजार ठेवीदारांना ४९ कोटींच्या ठेवी मिळाल्या

पाच लाख रुपयांच्या आतील सुमारे ७० हजार ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत करण्याची प्रक्रिया ऑक्टोबरअखेरपासून सुरू आहे.
शिवाजीराव भोसले सहकारी बॅंक
शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकसरकारनामा

पुणे : शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेमधील ठेवीदारांना मंगळवार (ता. ९) अखेर दोन हजार ५५१ ठेवीदारांना ४८ कोटी ६३ लाख रुपयांच्या ठेवी परत करण्यात आल्या आहेत. उर्वरित ठेवीदारांना येत्या दोन महिन्यांत टप्प्याटप्प्याने ठेवी वितरित करण्यात येतील, अशी माहिती शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेचे अवसायक डॉ. आर. एस. धोंडकर यांनी दिली.

पाच लाख रुपयांच्या आतील सुमारे ७० हजार ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत करण्याची प्रक्रिया ऑक्टोबरअखेरपासून सुरू आहे. रिझर्व्ह बॅंकेने शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेवर आर्थिक निर्बंध लादले होते. त्यामुळे ठेवीदारांना खात्यातून एक हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढता येत नव्हती. त्यामुळे गरीब, मध्यमवर्गीय ठेवीदार अडचणीत आले होते. ठेव विमा महामंडळाकडून निधी प्राप्त झाल्यानंतर या बॅंकेतील ठेवीदारांना पाच लाखांपर्यंतच्या ठेवी परत करण्यात येत आहेत.

शिवाजीराव भोसले सहकारी बॅंक
पुण्यात कोरोनाचे ११३ नवे रूग्ण

ठेव विमा महामंडळाकडून २७० कोटी रुपये प्राप्त झाले असून, बॅंकेकडील ११ कोटी रुपये अशा एकूण २८१ कोटींच्या ठेवी वितरित करण्यात येणार आहेत. त्यापैकी आजअखेर ४८ कोटी ६३ लाखांच्या ठेवी वितरित करण्यात आल्या आहेत. ठेवीदारांच्या खात्यामध्ये ३१ मे २०२१ अखेर शिल्लक रक्कम परत करण्यात येत आहे. ही रक्कम व्याजासह जास्तीत जास्त पाच लाख रुपयांपर्यंत असेल, असे बॅंकेचे अवसायक डॉ. धोंडकर यांनी सांगितले.

शिवाजीराव भोसले सहकारी बॅंक
हिंजवडी मेट्रोसाठी केंद्राकडून १२३० कोटीला मान्यता;...पण काम कधी सुरू होणार?

ज्या ठेवीदारांनी बॅंकेच्या शाखेत अद्याप केवायसी अर्ज जमा केलेले नाहीत. त्यांनी अर्जासोबत ठेव रकमेची पावती, दोन छायाचित्रे, आधार कार्ड, पॅन कार्ड, वीज बिल, इतर बॅंकेचा खाते क्रमांक, आयएफएससी कोड अशी कागदपत्रे (झेरॉक्स दोन प्रतींमध्ये) जमा करावीत, असे आवाहन अवसायकांकडून करण्यात आले आहे.

बॅंकेची सद्यःस्थिती

शाखा - १४

एकूण ठेवी - ४३२ कोटी रुपये

ठेवीदार संख्या - ७१ हजार ७७०

- एक लाख रुपयांच्या आतील ठेवीदार : ६३ हजार ६५८

- एक ते पाच लाख रुपयांपर्यंत ठेवीदार : ६ हजार ३००

- पाच लाख रुपयांवरील ठेवीदार : १ हजार ८१२

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com