Uddhav Thackeray : '... आता धनुष्यबाण हटवा', उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांना आदेश !

Uddhav Thackeray shivsankalp melava : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफचा केक खाणाऱ्या औलादीकडून हिंदुत्व शिकायचं का? असे टीकास्त्र उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री अमित शाह, नरेंद्र मोदी यांच्यावर सोडले.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeraysarkarnama
Published on
Updated on

Pune News : लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढलेल्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाला चांगले यश मिळाले. त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा आत्मविश्वास अधिक वाढला असून आगामी विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी शिवसेना ठाकरे गटाने सुरू केली आहे. ठाकरे गटाच्या काही जागा शिवसैनिकांमध्ये धनुष्यबाणा विषयी असलेल्या संभ्रमामुळे गेल्याचा ठाकरे गटाचा दावा आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसेना शाखांवरील अनेक बोर्डावर आजही धनुष्यबाणाची निशाणी तशीच आहे. ही धनुष्यबाण निशाणी हटवा आणि त्याठिकाणी मशाल चिन्ह लावा. त्यांच्या या आदेशाने आता राज्यातील गावा-गावात विशेषतः मुंबईत मोठा राडा होण्याची शक्यता आहे.

पुण्यात शनिवारी झालेल्या शिवसंकल्प मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी शिवसैनिकांनी तयार राहावे, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केले. गद्दारांनी आपला पक्ष चोरला, पक्षचिन्ह चोरलं, माझ्या वडिलांचे नाव आणि फोटो देखील चोरला, अशी टीका करत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा समाचार घेतला.

Uddhav Thackeray
Video Sanjay Raut : विधानसभेच्या विजयाची 'टॅगलाईन'च संजय राऊतांनी 'कॉन्फिडन्स'मध्ये टाकली सांगून

लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना नवीन पक्ष, चिन्ह घेऊन आपण लढलो. काही प्रमाणात यशस्वी झालो. आता थांबायचे नाही. विधानसभा निवडणुकीला मोठ्या ताकदीने सामोरे जायचे, असे आवाहन ठाकरे यांनी केले. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक गावागावात शहरांमध्ये आजही शिवसेनेच्या शाखांमधील बोर्डवर धनुष्यबाण आहे. या बोर्डांवरून धनुष्यबाण हटवा, असे आदेश उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना दिला.

अमित शाह टार्गेट

'तुमच्याकडून आम्हाला हिंदुत्व शिकण्याची गरज नाही. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफचा केक खाणाऱ्या औलादीकडून हिंदुत्व शिकायचं का? असे टीकास्त्र उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री अमित शाह, नरेंद्र मोदी यांच्यावर सोडले. पावसाचे थैमान झाल्यावर आता भगव्याचे थैमान होणार असल्याचा विश्वास देखील ठाकरे यांनी व्यक्त केला.

Uddhav Thackeray
Sharad Pawar Vs Ajit Pawar : थेट तटकरेंचाच 'तो' व्हिडिओ शेअर करत शरद पवार गटानं अजितदादांचा दावाच खोडून काढला

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com