Pune Vidhan Sabha : पुण्यातील विधानसभेच्या सहा जागांवर दावा; ठाकरे गटाचे नेमके गणित काय?

Pune Shivsena UBT : शहर शिवसेनेकडून सहा विधानसभा मतदारसंघाचा वरिष्ठांना प्रस्ताव
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama

Pune Political News : आगामी विधानसभा महाविकास आघाडी म्हणून ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेस एकत्र लढणार असल्याचे जाहीर स्पष्ट करण्यात आले आहे. याला 24 तास उलटत नाही तोच पुणे शिवसेना ठाकरे गटाकडून शहरातील सहा मतदारसंघावर दावा ठोकला आहे. त्यामुळे आघाडीत नेमके चाललेय तरी काय, अशी चर्चा सुरू झालेली आहे.

विधानसभा निवडणुकीत शहरातील कोथरूड Kothrud, पर्वती, कसबा, पुणे कॅन्टोन्मेंट, वडगाव शेरी आणि हडपसर हे मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळावेत, असा आग्रह शहर पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्याबाबत असणारी मागणी त्यांनी वरिष्ठ नेत्यांकडे लावून धरली आहे. परिणामी स्थानिक गणिते जुळवताना आघाडीत मोठी कसरत होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

मुंबई येथील शिवसेना भवनात ठाकरे गटाच्या पुणे शहरातील पदाधिकाऱ्यांची बैठक शनिवारी (ता. 14) पार पडली. यावेळी लोकसभा निवडणुकीचा आढावा घेण्यात आला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेनेसाठी कोणत्या विधानसभा मतदारसंघांत निवडणूक लढविणे योग्य ठरेल, याबाबतही चर्चा करण्यात आली. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी मते मांडली. याबाबतचा अहवाल शिवसेना नेत्यांना सादर करण्यात आला.

शहरात यापूर्वी शिवसेनेचे चार आमदार निवडून आलेले आहेत. संघटनात्मक बांधणी आणि जमेच्या बाजू याचा प्रामुख्याने विचार करून कोथरूड, पर्वती, कसबा, पुणे कॅन्टोन्मेंट, वडगाव शेरी, हडपसर हे सहा विधानसभा मतदारसंघ मिळावेत, असे पुणे शहर पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

Uddhav Thackeray
Saroj Ahire : शरद पवारांना दगा देणाऱ्या सरोज अहिरे यांची आमदारकीची वाट बिकट?

या बैठकीस पश्चिम महाराष्ट्र समन्वयक, शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर, शिवसेना उपनेते पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन आहिर, पुणे संपर्क संघटिका स्नेहल आंबेकर, शालिनी देशपांडे, सहसंपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर, माजी आमदार महादेव बाबर, शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, जिल्हाप्रमुख शंकर मांडेकर, राजेंद्र काळे, विजय देशमुख, तसेच शिवसेना, महिला आघाडी, युवा सेना, युवती सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Uddhav Thackeray
Video EVM & Mobile : मोबाईल EVM ला कनेक्ट होतो का? निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्टच सांगितलं

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com