VIDEO महायुतीत मिठाचा खडा; अजितदादांनी केली 'या' नेत्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

Tanaji Sawant Controversial Statement Ajit Pawar Complaint to CM Eknath Shinde: महायुतीबाबत नेहमीच वादग्रस्त विधाने करणाऱ्या सावंतांच्या तक्रारींचा पाढा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर वाचला. आता मुख्यमंत्री त्या नेत्याला समज देणार का? हे लवकरच समजेल.
CM Eknath Shinde, Ajit Pawar
CM Eknath Shinde, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

महायुतीच्या विरोधात सतत विधानं करणं आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांना भोवणार असल्याचे चित्र आहे. त्यांच्याविरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केल्याची माहिती आहे. साम टीव्हीने याबाबतचे वृत्त दिले आहे. महायुतीबाबत नेहमीच वादग्रस्त विधाने करणाऱ्या सावंतांच्या तक्रारींचा पाढा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर वाचला.

कॅबिनेटमध्ये मांडीला मांडी लावून बसलो तरी बाहेर आलो की उलट्या होतात, राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत पटलं नाही, असे विधान सावंत यांनी काल (गुरुवारी) केले होते. आजही त्यांनी धाराशिव लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या झालेल्या पराभवावर भाष्य केले आहे.

सावंत यांच्या विधानावरुन घटक पक्षात दुरावा होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी विनंती अजितदादा आणि तटकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली आहे. याप्रकरणी लक्ष घालण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी दिली.

CM Eknath Shinde, Ajit Pawar
Mahayuti Politics: बेभान नेते, उथळ वक्तव्यांनी महायुतीचा वारू भरकटला?

सोशल मीडियावर सध्या सावंत यांची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे.'राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसोबत बसल्यावर उलट्या होतात,' असं सावंत यांनी म्हटले आहे. सावंत यांच्या या विधानावरुन वक्तव्यानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीतून संताप व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादीचे (अजितदादा पवार ) मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी सत्तेतून बाहेर पडण्याचं आवाहन अजितदादांना केलं आहे. तर, आमदार अमोल मिटकरी यांनीही सावंत यांचा समाचार घेतला घेतला आहे.

CM Eknath Shinde, Ajit Pawar
Prashant Paricharak: प्रशांत परिचारकांना मोठा धक्का; कट्टर समर्थक 'तुतारी'फुंकणार

तानाजी सावंत काय म्हणाले?

  • राष्ट्रवादीसोबत आपले आयुष्यभर पटले नाही. आता मंत्रिमंडळात त्यांच्या मांडीला मांडी लावून बसावे लागते. मात्र, बैठकीनंतर बाहेर आल्यावर उलट्या होतात.

  • धाराशिव लोकसभा निवडणुकीत आपल्या मनाविरुद्ध तिकीट दिलं गेलं. ज्याला आपण मतदान करत नव्हतो त्यांना तिकीट दिलं. त्यामुळे मतदान करा, असे म्हणायला मी तुमच्यापार्यंत आलो नाही. कारण आपल्यालाच पटलेलं नव्हतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com