Purandar News : पुरंदरचे माजी आमदार सध्या बारामतीत काही वल्गना करत आहेत, त्यांनी आधी स्वतःचे पहावे : राष्ट्रवादीचा शिवतारेंना टोला

राज्यात मिंधे-भाजप सरकार स्वार्थी असून निवडणुकीवेळी त्यांना शेतकऱ्यांची आठवण होते.
Neera Bazar samiti Director
Neera Bazar samiti DirectorSarkarnama
Published on
Updated on

सासवड (जि. पुणे) : पुरंदरचे माजी आमदार सध्या बारामतीच्या (Baramati) वाड्या-वस्त्यांवर फिरत असून काहीही वल्गना करीत आहेत. त्यांनी आधी पुरंदरमध्ये स्वतःचे नीट पहावे; मगच त्यांनी बारामतीमध्ये पहावे, असा टोला सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप यांनी माजी आमदार विजय शिवतारेंचे (Vijay Shivtare) नाव न घेता लगावला. (Vijay Shivtare currently roaming around the mansions of Baramati with empty chatter : Purushottam Jagtap)

पुरंदर तालुक्यातील नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विरोधी पक्षनेते अजित पवार आणि पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखालील महाविकास आघाडी पुरस्कृत सोमेश्वर सहकार विकास पॅनेलच्या नवनिर्वाचित सर्व १८ संचालकांचा सत्कार करण्यात आला. त्यात जगताप बोलत होते. बारामतीमधील निवडणुकांच्या यशामागील गमक सांगताना बारामती राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी ‘आम्ही एकाचेच ऐकतो, त्यामुळे चांगले काम होते,’ असे सांगितले.

Neera Bazar samiti Director
Saroj Patil On Sharad Pawar Retirement: अध्यक्षपदाच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर पवारांना त्यांच्या बहिणीने दिला हा सल्ला…

राज्यात मिंधे-भाजप सरकार स्वार्थी असून निवडणुकीवेळी त्यांना शेतकऱ्यांची आठवण होते. हे खोक्यांचे सरकार असून, नीरा बाजार समितीसह राज्यातील इतर बाजार समितीच्या निवडणुकीतही यांनी पैशांचा वापर केला. मात्र, शेतकऱ्यांनी यांना साफ नाकारले आहे. यापुढील सर्व निवडणुकांना सामोरे जाताना महाविकास आघाडीच्या विचाराने एकजुटीने सामोरे जाऊ, असे आमदार संजय जगताप यांनी स्पष्ट केले.

Neera Bazar samiti Director
Sharad Pawar Retirement News : पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर धाराशिव, बुलडाण्याच्या राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षांचा राजीनामा

ते म्हणाले की, नीरा कृषी उत्पन्न बाजार समिती मागील संचालक मंडळाने कर्जमुक्त करून 'ड' वर्गातून 'ब' वर्गात आणले. आता बाजार समिती आर्थिक सक्षम करण्यासाठी पणनच्या माध्यमातून विविध योजना राबवू, तालुक्यातील सर्व बाजार निरा बजार समितीच्या अंतर्गत करण्याचे काम करू. सर्व सामान्य शेतकऱ्यांची बाजार समिती म्हणून निरा बाजार समिती ओळखली जाईल यासाठी महाविकास आघाडी कडून एकत्रितपणे प्रयत्न करू

कार्यक्रमास विजय कोलते, सुदाम इंगळे, दत्ता झुरंगे, प्रचार प्रमुख नंदकुमार जगताप, बबूसाहेब माहूरकर, संभाजी झेंडे, प्रदीप पोमण, माणिक झेंडे यांनी मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी नवनिर्वाचित संचालक अशोक निगडे, देविदास कामठे, शरद जगताप, पंकज निलाखे, बाळासाहेब जगदाळे, वामनभाऊ कामठे, महादेव टिळेकर, शहाजान रफिक शेख, शरयू देवेंद्र वाबळे, भाऊसाहेब गुलदगड, गणेश होले, बाळू शिंदे, सुशांत कांबळे, मनिषा देविदास नाझीरकर, अनिल माने, राजकुमार शहा, विक्रम दगडे यांचा सत्कार करण्यात आला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com