Sharad Pawar Retirement News : पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर धाराशिव, बुलडाण्याच्या राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षांचा राजीनामा

जोपर्यंत पवारसाहेब आपला राजीनामा मागे घेत नाहीत, तोपर्यंत आम्ही आमचा राजीनामा मागे घेणार नाही.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) अध्यक्षपदावरून पायउतार होत आहेात, अशी घोषणा मुंबईतील वाय. बी. सेंटरमधील लोक माझे सांगाती-भाग दोन या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात केली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप झाला. त्याचे पडसाद तत्काळ सभागृहातच उमटले, त्याचबरोबर राज्यभर उमटत आहेत. बुलडाणा आणि धाराशिवच्या जिल्हाध्यक्षांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. (After Pawar's announcement, Dharashiv, Buldhana's ncp District President resigned)

बुलडाण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नाझीर काझी आणि धाराशिवचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. जोपर्यंत पवारसाहेब आपला राजीनामा मागे घेत नाहीत, तोपर्यंत आम्ही आमचा राजीनामा मागे घेणार नाही, अशी घोषणाही या दोघांनी केली आहे. राज्यभरातील कार्यकर्तेही आक्रमक झाले आहेत. तेही पवारांनी राजीनामा मागे घ्यावेत, अशी मागणी करत आहेत.

Sharad Pawar
Sharad Pawar Announces Resignation: प्रफुल्ल पटेल हात जोडून विनंती करत होते; राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मागे हटायला तयार नव्हते!

लोक माझे सांगाती भाग दोन या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून पायउतार होतो आहेात, अशी घोषणा केली. त्यानंतर सभागृहातच एकच गोंधळ सुरू झाला. शरद पवार यांच्या जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या. खुद्द प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे अश्रू अनावर झाले होते. अख्ख भाषण त्यांनी रडतच केले.

Sharad Pawar
Sharad Pawar Announced Retirement: तुम्ही थांबणार असाल, तर आम्ही सर्वजण राजीनामे देतो : जयंत पाटलांनी रडतच केली मागणी

तुम्ही थांबणार असाल तर आम्ही सर्वजण राजीनामे देतो, अशी घोषणाच जयंत पाटील यांनी केली. अनेक नेत्यांनी पवारांना निर्णय मागे घेण्याचे साकडे घेतले. सभागृहातील सर्वजण रडत होते, अनेकजण त्यांच्या जिंदाबादची घोषणा करत होते. सुमारे दोन ते तीन तास वाय. बी. सेंटरमध्ये हा प्रकार सुरू होता. दुसरीकडे राज्यभरात त्याचे पडसाद उमटत आहेत. अनेक कार्यकर्त्यांनी आमदार, खासदारांकडे याबाबतची विचारणा फोनवरून करत आहेत.

Sharad Pawar
Sharad Pawar News : राष्ट्रवादीची कमिटी जो निर्णय घेईल, तो मला मान्य असेल : राजीनाम्यानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

धाराशिवचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिजरादार आणि बुलडाण्याचे जिल्हाध्यक्ष काझी यांनीही आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे पवार आपला निर्णय मागे घेतात की आपल्या निर्णयावर ठाम राहतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com