Uddhav Thackeray on Modi : उध्दव ठाकरेंकडून मोदी- शाह यांची हिटलरशी तुलना ; म्हणाले, '' हिटलरसुद्धा असाच...''

Maharashtra Politics : '' ढळढळीत सत्य दडवून टाकायचे आणि...''
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai : ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. यावेळी त्यांनी मोदी, शाह यांची तुलना थेट हिटलरशी केली. हिटरलही असाच माजला होता. हिटलर म्हणजे, छळ, लोकांची कत्तल असे चित्र डोळ्यापुढे येते. मात्र, हिटलरही असा अचानक जन्माला आला नव्हता. हेही लक्षात घेण्यासारखे आहे असल्याचं विधान ठाकरेंनी यावेळी केलं.

वरळी येथील राज्यव्यापी शिबिरात उध्दव ठाकरें(Uddhav Thackeray)नी मोदी शाह यांच्यासह शिंदे आणि फडणवीसांवर टीकेची तोफ डागली. ठाकरे म्हणाले, हिटलरने आपल्याविरोधात काही घडणार नाही, याची काळजी घेतली. त्यानंतर विरोधक संपवले. ढळढळीत सत्य दडवून टाकायचे आणि मनमानी करायची, हे तो करत होता. त्याचदिशेने आपण जात नाही ना? असा सवालही ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला. तसेच हिटलरचे चिन्हही स्वस्तिकच होते असं म्हणत अप्रत्यक्षपणे मोदी-शहा यांच्यावर हल्लाबोल केला.

तसेच यावेळी त्यांनी मी जेव्हा अफजल खान हा शब्द वापरला; तेव्हा लोक मला विचारत होते, तो शब्द का वापरला हे आता कळले ना असंही ते म्हणाले.

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray On Modi : उध्दव ठाकरेंचं खुलं आव्हान; म्हणाले,'' हिंमत असेल तर पंतप्रधान मोदींनी...''

फडणवीसांची अवस्था म्हणजे सहनही होत नाही आणि....

उध्दव ठाकरेंनी आपल्या भाषणात शिवसेनेच्या जाहिरातीवरून देवेंद्र फडणवीसां(Devendra Fadnavis)ना चिमटा काढला. ठाकरे म्हणाले, फडणवीस यांनी अवस्था सहन होत नाही आणि सांगताही येत नाही अशी झाली आहे.‘‘सत्तेसाठी लाचारी पत्करून मिंधे भाजपमध्ये गेले. गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरे घातले जात आहेत. तिथे डोळे वटारले की इकडे रस्ते ओले होतात असंही ते म्हणाले.

'' हिंमत असेल तर पंतप्रधान मोदींनी...''

'' आपल्या घरात येऊन दमदाटी करतात. फोडाफोडी करतात. आम्ही नामर्दाची औलाद नाहीत. सत्तेची मस्ती हा फुगलेला फुगा आहे. हा फुगा फोडायला वेळ लागणार नाही. मस्ती मणिपूरमध्ये जा आणि दाखवा. तिथं लोकं ईडी(ED), सीबीआय यांना विचारत नाही. मणिपूर पेटला. तिथं काय केलं अमित शाह यांनी असा सवाल ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. तसेच विश्वगुरू अमेरिकेत विकत घेतलेल्या माणसांसमोर आपलं ज्ञान पाजळतात. हिंमत असेल तर पंतप्रधान मोदींनी मणिपूरमध्ये जाऊन दाखवावं'' असं खुलं आव्हान ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिलं.

Uddhav Thackeray
Mahavikas Aghadi: इच्छा आहे तोपर्यंत आघाडीमध्ये राहू म्हणणाऱ्या राऊतांना अजितदादांनी दिल्या शुभेच्छा !

'' गद्दारांच्या फौजेचं नेतृत्व करण्यापेक्षा...''

ठाकरे म्हणाले, गद्दारांच्या फौजेचं नेतृत्व करण्यापेक्षा मूठभर निष्ठावानाचं नेतृत्व करायला मला आवडेल. उद्या शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. तर परवा जागतिक गद्दार दिन आहे. तुम्ही आधी हात उचलू नका, पण कुणी केला उचलला तर तो हात वेगळा करा असा आदेशही ठाकरेंनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला.

आम्ही नामर्दाची औलाद नाही. यापुढे आमच्या पानिपतच्या युध्दावेळी ही अब्दाली बाहेर पडून आला होता. त्याचं नावही शाह होतं. अमित शाह नाही असा टोलाही उध्दव ठाकरेंनी यावेळी लगावला.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com